मुंबईतील कोविड रुग्णालय आणि जंबो कोविड सेंटरमधील आयसीयू बेड आता फुल्ल झाले असून व्हेंटीलेटर्सची संख्याही दहा ते १५ एवढेच शिल्लक राहिलेले आहेत. मात्र, एका बाजुला हे बेड फुल्ल होत असले, तरी ऑक्सिजन बेड आणि सर्वसाधारण बेड मात्र मोठ्या संख्येने शिल्लक आहेत. मुंबईतील सर्व कोविड रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील ३,८४३ सर्वसाधरण बेड शिल्लक आहेत, तर ऑक्सिजनचे ९१४ बेड रिकामी आहेत.
३,८८५ रुग्ण खाटा रिकाम्या आहेत!
मुंबई महापालिकेच्या खासगी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांसह कोविड सेंटरमधील सर्वसाधारण, आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर इत्यादी ३,८८५ रुग्ण खाटा रिकाम्या आहेत.
(हेही वाचा : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लवकरच ऑक्सिजन प्लांट! ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीचा परिणाम)
९१६ ऑक्सिजन खाटा रिकामी आहेत!
यामध्ये सर्वसाधारण खाटा या १८ हजार ७०३ एवढ्या असून त्यातील १४ हजार ८६० खाटांवर उपचार सुरु आहेत. उर्वरीत ३,८४३ खाटा रिक्त आहेत. तसेच ऑक्सिजनचे एकूण १० हजार ९८१ खाटा असून त्यातील १० हजार ६५ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहे. तर ९१६ ऑक्सिजन खाटा रिकामी आहेत. मात्र, या खाटा रिकाम्या असल्या तरी आयसीयूचे २२ एप्रिलपर्यंत केवळ ४५ खाटाच रिकाम्या होत्या. परंतु त्याही आता भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून आयसीयू बेड आणि व्हेंटीलेटर्सचीची मागणी जास्त असून त्यातुलनेत सर्वसाधारण खाटा व ऑक्सिजन खाटा रिकामीच असल्याचे दिसून येत आहेत.
Join Our WhatsApp Community