जानेवारी महिन्याच्या प्रारंभी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी करत राज्यातील मैदाने, प्राणिसंग्रहालय, उद्याने बंद करण्यात आली होती. या निर्बंधांमध्ये बदल करत सरकारने आता, सुधारित नियमावली जाहीर केली आहे. 1 फेब्रुवारी 2022 पासून बंद असलेली सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
१ फेब्रुवारी २०२२ पासून जारी केलेली सुधारित नियमावली
१. भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना हॉलच्या 50% क्षमतेसह परवानगी दिली जाईल.
३. जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने खुले राहतील.
४. हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहे वेळेनुसार 50 टक्के क्षमतेने सुरू
५. ब्युटी पार्लर, सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
६. समुद्रकिनारे, उद्याने, थीम पार्क स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरू राहतील.
७. रात्रीचे निर्बंध शिथिल
८. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळेच लग्नासाठी 200 व्यक्ती उपस्थित राहू शकतील.
९. स्पर्धात्मक खेळ आणि घोड्यांच्या शर्यती अशा ठिकाणी 25% प्रेक्षकांना परवानगी असेल. गर्दी टाळावी.
या सर्व नियमांचे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच कोविड संदर्भात नियमांचे काटेकोर पालन करावे. हे आदेश 1 फेब्रुवारी 2022 पासून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत लागू राहतील.
Join Our WhatsApp Community