BMC : मढ आयलॅण्ड रुपवीर बंगल्यावर महापालिकेने चालवला बुलडोझर

1342
BMC : मढ आयलॅण्ड रुपवीर बंगल्यावर महापालिकेने चालवला बुलडोझर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

भूमि अभिलेखात बदल करून १९६० ची बांधकामे दाखवण्याचे प्रयत्न केल्याचे प्रकरण विधीमंडळात चर्चिला गेल्यानंतर तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिल्यानंतर मढ आयलंडमधील परिसरातील एरंगल गावातील रुपवीर बंगलोवर अखेर महापालिकेने बुलडोझर चढवला. या बंगलोचा वापर चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरासाठी केला जात होता. तब्बल दोन हजार चौरस फुटाचे बांधकाम तोडून कारवाईचा श्रीगणेशा पी उत्तर विभागाने केला आहे. (BMC)

New Project 2025 04 05T203532.337

(हेही वाचा – केंद्रीय संरक्षणमंत्री Rajnath Singh यांनी ‘आयएनएस सुनयना’ या युद्धनौकेला दाखवला हिरवा झेंडा)

मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभाग हद्दीतील मढ आयलॅण्ड परिसराच्‍या एरंगल गाव (मढ-मार्वे मार्ग) येथील रूपवीर बंगलो इमारतीच्या तळ मजल्याचे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले. या बंगल्यामध्ये सहा मेक अप खोल्‍यांचाही समावेश होता. उप आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्‍यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सुमारे २ हजार चौरस फुटाच्‍या क्षेत्रफळात उभारलेली तळ मजल्याची इमारत पोलिस बंदोबस्‍तात तोडण्यात करण्‍यात आली आहे. ०१ पोकलेन आणि २ जेसीबीच्या सहाय्याने केलेल्‍या पाडकाम कारवाईत १० कामगार, ०४ पोलीस, ८ अभियंते सहभागी झाले होते. तसेच या कारवाईत इमारत आणि कारखाना विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. (BMC)

New Project 2025 04 05T203654.287

(हेही वाचा – Dhananjay Munde यांची याचिका फेटाळली; करुणा शर्मा यांच्या बाजूने न्यायालयाचा निर्णय)

विशेष म्हणजे भूमी अभिलेखाच्या नकाशात फेरफार करून बोरिवली, मालाड, गोरेगाव, कुर्ला आदी भागांतील अनेक बांधकामे १९६० पूर्वीची दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याबाबत विधीमंडळात आवाज उठवल्यानंतर महसूल मंत्री यांनी जी प्रकरणी न्यायप्रविष्ठ नाहीत त्यावर त्वरीत कारवाई केली जावी आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार जसे निर्णय येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जावी अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार पी उत्तर विभागातील एरंगळमधील या रुपवीर बंगल्याबाबत न्यायालयातील याचिकेवर निर्णय आल्यानंतर महापालिकेच्या पी उत्तर विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या परिमंडळ पाचच्या उपायुक्तपदाचा भाग्यश्री कापसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही पहिली मोठी कारवाई त्यांनी केली आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.