BMC : मुंबईतील वाढत्या अतिक्रमणांसह अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचे दुर्लक्ष; आयुक्तांचे आदेश केवळ कागदावरच

347
BMC : मुंबईतील वाढत्या अतिक्रमणांसह अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचे दुर्लक्ष; आयुक्तांचे आदेश केवळ कागदावरच
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील अनेक भागांमध्ये आजही अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणे वाढतच जात असून याकडे महापालिकेचे विद्यमान आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांचे दुर्लक्ष होत आहे. महापालिका आयुक्त यांनी मुंबईतील सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला गती देण्यात येत नाही. आधीच कारवाई करण्यात ढिलाई आणि त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा फायदा घेत अनधिकृत बांधकामे मोठ्याप्रमाणात होत आहे. मात्र, प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये अतिक्रमणांना पेव फुटत असल्याचे दिसून येत आहे. (BMC)

महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर मागील जून २०२४रोजी डॉ. भूषण गगराणी यांनी सहपोलिस आयुक्त (दक्षता) सत्यनारायण चौधरी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत एक धाडसी निर्णय घेत पदपथ अतिक्रमण मुक्त व फेरीवालामुक्त तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश विभागाच्या सहायक आयुक्त तसेच विभागाचे पदनिर्देशित अधिकाऱ्यांना दिले होते. मुंबईत बेकायदेशी बांधकामांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला असतानाही महापालिकेच्या विभागांचे सहायक आयुक्त तसेच विभागांमधील इमारत व कारखाना विभागाचे अधिकारी, पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून केले जात नाही. परिणामी मुंबईतील अनेक भागांमध्ये अनधिकृत बांधकामे फोफावू लागली आहेत. (BMC)

(हेही वाचा – नालासोपारामध्ये चार नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार करा; आमदार Rajan Naik यांची मागणी)

मुंबई शहरांमधील भेंडीबाजार, शिवडी, वडाळा, धारावी, अँटॉप हिल वांद्रे पूर्व भागातील बेहराम पाडा, गरीब नवाज नगर, भारतनगर, खारडदांडा तसेच खार व सांताक्रुझ पूर्व, मालाड मालवणी, वर्सोवा, दहिसर गणपत पाटील नगर, मालाड कुरार व्हिलेज, कांदीवली दामू नगर यासह पूर्व उपनगरांमधील देवनार, गोवंडी, मानखुर्द चिता कॅम्प, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, कांजूरमार्ग, मुलुंड आदी भागांमध्ये मोठ्याप्रमाणात झोपडपट्टींचे मजले वाढत जात आहे. मोकळ्या जागांवर अतिक्रमणे केली जात आहेत. परंतु महापालिका प्रशासनाचे याकडे लक्षच दिसून येत नाही. सन ऑक्टोबर २०२१ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर पुढील सहा महिन्यांमध्येही महापालिकेला या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली नव्हती. पण त्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर तत्कालिन आयुक्त इक्बालसिंह चहल आणि त्यांच्या जागी आलेल्या डॉ. भूषण गगराणी यांचेही मुंबईतील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. (BMC)

मुंबई महापालिकेच्या जागांसह रेल्वे, जिल्हाधिकारी, म्हाडा, बीपीटी आदीच्या जागांवर अनधिकृत बांधकामे होत असल्याने यावर कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात महापालिकेच्या भूखंडावरील अतिक्रमणांवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. तसेच आपल्या भुखंडावरील अनधिकृत बांधकामांवर महापालिका स्वत: कारवाई करत नाही आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या जागांवरील अतिक्रमणांकडे बोट दाखवून कारवाई करण्यात अपयश येत असल्याचे सांगत स्वत:चे पाप महापालिका प्रशासन झाकण्याचा प्रयत्न करत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.