BMC : अतिवृष्टीनंतर रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी महानगरपालिका ‘अलर्ट मोडवर’

251
BMC : मालमत्ता कर न भरणाऱ्या पहिल्या १० थकबाकीदारांची नावे जाहीर; सुमारे ६०० कोटींच्या वसुलीसाठी जारी केल्या नोटीस

मुंबईत एका दिवसात अवघ्या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सखल भागात जोरदार पावसामुळे पाणी साचले. परिणामी काही रस्ते खराब तर काही ठिकाणी खड्डे सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२७ प्रभागातील दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या क्षेत्रात स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे (Proactively) दौरे करून खड्डे शोधावेत आणि खड्डे छोट्या आकारांचे असतानाच ते भरावेत. पावसाची उघडीप मिळताच खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेत रस्ते सुस्थितीत ठेवावेत, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. (BMC)

मुंबईत सोमवारी (८ जुलै २०२४) मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत ६ तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुंबईकर नागरिकांना रस्ते प्रवासादरम्यान कोणत्याही गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून कार्यवाही करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार रस्ते वाहतूक योग्य सुरक्षित स्थितीत आणण्यासाठी तसेच खड्डेमुक्त रस्त्यांसाठी तातडीने उपाययोजना आखण्याबाबत मंगळवारी (९ जुलै २०२४) अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी बांगर यांनी हे निर्देश दिले. प्रमुख अभियंता (रस्ते) गिरीश निकम यांच्यासह अभियंते, अधिकारी उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – Ramesh Bais: ‘मविआ’च्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक घेण्याची केली मागणी)

अतिवृष्टीमुळे रस्ते खरवडण्याची, रस्त्यांना खड्डे पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे २२७ दुय्यम अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात रस्त्यांवर उतरले पाहिजे. दुरूस्तीयोग्य रस्ते (बॅड पॅचेस), खड्डे शोधले पाहिजेत. स्वत:हून खड्डे भरण्याची कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश अभिजित बांगर यांनी दिली. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.