BMC : सफाई कर्मचाऱ्यांनी पाहिले याची देही, याची डोळा ‘अस्तित्व’

3244
BMC : सफाई कर्मचाऱ्यांनी पाहिले याची देही, याची डोळा ‘अस्तित्व’

महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी संपूर्ण महानगरातील कचरा संकलित करतात. मुंबई अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटत असतात. या कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी, ते रोज करीत असलेल्या कामातून त्यांना तसेच त्यांच्या परिवाराला ऊर्जा मिळावी, यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अभिनव उपक्रम हाती घेत स्वच्छता कर्मचाऱ्यांवर आधारित कथानक असलेले ‘अस्तित्व’ हे नाटक घनकचरा व्यवस्थापन खात्यातील स्वच्छता कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी विनाशुल्क प्रयोग ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रंगमंचावर मांडलेले आपलेच अस्तित्व या सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबांनी याची देही, याची डोळा पाहिले. (BMC)

मुंबई अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटत असतात. या कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी, ते रोज करीत असलेल्या कामातून त्यांना तसेच त्यांच्या परिवाराला ऊर्जा मिळावी, यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी हे नाटक कर्मचाऱ्यांना दाखविण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी २३ जुलै रोजी भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात तर त्या आधी मुलुंड महाकवी कालिदास नाट्यगृहात प्रयोग पार पडले. मुंबईतील धावपळीच्या जगण्यात, वाढत जाणाऱ्या अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचे ‘अस्तित्व’ शोधणारे ‘अस्तित्व’या नाटकाचे प्रयोग पाहून महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय अक्षरश: भारावून गेले. (BMC)

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांची ‘ती’ स्टँडर्ड धमकी कोणती?)

लोकप्रिय अभिनेता भरत जाधव यांच्या ‘भरत जाधव एंटरटेनमेंट’या संस्थेने अस्तित्व हे नाटक साकारलेले आहे. मंगळवारच्या या सादरीकरणावेळी उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) संजोग कबरे, प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, घन कचरा व्यवस्थापन खात्यातील स्वच्छता कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. याआधी मुलुंड आणि बोरिवली येथे पार पडलेल्या विशेष प्रयोगप्रसंगीही महानगरपालिका कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. प्रत्येक कर्मचाऱ्यांसोबत त्याच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांनाही मोफत प्रवेश देण्यात आला. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकात भरत जाधव यांच्यासह चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर हे प्रमुख भूमिकेत आहेत. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.