महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे भाभा रुग्णालयात ऑक्सिजन टाकी रिकामी!

मागील आठवड्यात ऑक्सिजन अभावी कुर्ला भाभा रुग्णालयावर 35 कोविड रुग्णांना अन्य ठिकाणी हलवण्याची नामुष्की आली होती.

66

कुर्ला भाभा रुग्णालयात ऑक्सिजन टाकी 6 महिन्यांपासून तयार असून त्यात लिक्विड ऑक्सिजनचा साठा न भरल्यामुळे केलेल्या खर्चाचा उपयोग झालाच नाही. यामुळे ही ऑक्सिजनची टाकी उपयोगात येत नसल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

35 रुग्णांचे स्थानांतरण करण्याची नामुष्की!

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कुर्ला भाभा रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याबाबतीत 12 जून 2020 रोजी वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे बैठक आयोजित झाली होती. 1 किलो लीटर क्षमतेची 2 यंत्रे बसविण्यात आली असून दोन्ही मिळून 250 जंबो सिलिंडर इतकी क्षमता तयार होईल, जी 15 दिवस योग्य रीतीने सुरु राहील. मागील आठवड्यात ऑक्सिजन अभावी कुर्ला भाभा रुग्णालयावर 35 कोविड रुग्णांना अन्य ठिकाणी हलवण्याची नामुष्की आली होती. ही व्यवस्था सुरु झाली असती, तर नागरिकांना आणि डॉक्टर मंडळींना झालेला मनःस्ताप आपण थांबवू शकलो असतो.

(हेही वाचा : कोविड सेंटर उभारणीसाठी महापालिकेला नगरसेवक, सामाजिक संस्थांची साथ!)

5 दिवसांत टाकी सुरू करणार!

आमदार मंगेश कुडाळकर यांनी सोमवार, 26 एप्रिल रोजी ऑक्सिजन टाकी सुरू करण्याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा शर्मा यांची भेट घेतली. यावेळी अनिल गलगली, किरण दामले, आशिष पटवा, शाखाप्रमुख कमलाकर बने उपस्थित होते. कार्यान्वयन बाबतीत पालिका अधिकारी कृष्णा पेरिकर यांच्याशी चर्चा झाली असून 5 दिवसांत टाकी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.