आता तुमची इमारती होणार सील, महापालिकेचे नवे धोरण

147

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आता खबरदारीचा उपाय म्हणून इमारत सील करण्यासंदर्भात नवे धोरण जाहीर केले आहे.  एखद्या इमारतीत किंवा विंगमध्ये राहत असलेल्या एकूण रहिवाशांच्या २० टक्के  रहिवाशांना कोरोनाची बाधा झाल्यास संबंधित इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे.

काय आहे नवे धोरण?

  • कोरोनाबाधित रूग्ण होम क्वारंटाईन असल्यास किमान १० दिवस घरी अलगिकरणात रहावे लागेल. तसेच त्याला सलग तीन दिवस ताप नसावा.
  • हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींना सात दिवस होम क्वारंटाईन राहावे लागेल. ते ५ व्या किंवा सातव्या दिवशी आरटीपीसीआर करू शकतील. जर लक्षण आढळल्यास तात्काळ आरटीपीसीआर करावी लागेल.
  • बिल्डींग सील केलेल्या इमारतींमधील रहिवाशांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू देण्याची जबाबदारी सोसायटीच्या कमिटीवर राहिल.

मुंबईतील नव्या रुग्ण वाढीचा आकडा ८ हजारावर स्थिरावला

मुंबईत आज ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. गेल्या चोवीस तासात मुंबईत तब्बल ८ हजार ८२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईवरील कोरोनाचे संकट अधिकच गडद होत चालले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.