आपले नाव मतदार यादीत आहे का? ‘किऑस्क’वर जाऊन पहा

५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्यादृष्टीने व्यापक मतदार नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून याचे जनजागृती अभियान महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. यासाठी मुंबईत आता २० किऑक्स मशीनची खरेदी केली केली जाणार आहे. या मशीनच्या माध्यमातून नागरिकांना आता त्यांचे मतदार यादीत नाव शोधणे सहज शक्य होणार आहे. या किऑस्कवर १ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली मतदार यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला २०२२ला केंद्रस्थानी ठेवून मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी करण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. भारत निवडणूक आयोगामार्फत १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून यावर ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येतील, असे नमूद करत २० डिसेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. तर ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२२१ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदानापासून किंवा निवडणूक लढवण्यापासून वंचित राहू नये याकरता वेळीच मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी आवश्यकता आहे.

(हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय फेटाळला! संप चिघळला)

१९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध

संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे औचित्य साधून अधिकाधिक पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत नोंदवावीत, दुबार नोंदणी, समान नोंदणी, आवश्यकता असल्यास पत्त्यात अथवा नावात दुरुस्ती, आदींसाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे. त्यानुसार मुंबईतील नागरिकांना त्यांचे नाव मतदार यादीत सहज शोधणे आणि सुलभ व्हावे यासाठी १ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात येणारी प्रारुप मतदार यादी किऑस्कद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या २० किऑक्सच्या खरेदीसाठी ८ लाख ४४ हजार ८८० रुपये खर्च केले जाणार आहे. एस.सी.ई सिलेक्ट कंपनीकडून या मशीन्स निवडणूक विभागाच्या माध्यमातून खरेदी करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाची www.nvsp.inwww.ceo.maharashtra.nic.in ही संकेतस्थळे उपलब्ध आहेत. तसेच चौकशीकरिता १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here