अखेर सोसायट्यांमध्ये होणाऱ्या लसीकरण मोहिमांसाठी नियमावली तयार!

92

मुंबई खासगी कंपन्या आणि गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहिमा राबवण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिल्यानंतर मुंबईत तब्बल ११ ठिकाणी बनावट लसीकरण राबवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले आहे. न्यायालयाने अशा प्रकारे लसीकरण मोहिमा राबवण्यासाठी नियमावली बनवण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे महापालिकेने नियमावली बनवली आहे. यासाठी अधिकृत खासगी लसीकरण केंद्रांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

सोसायट्यांसाठी ही आहे नियमावली! 

  • केवळ नोंदणीकृत कोरोना लसीकरणाच्या खासगी केंद्रांकडूनच हे लसीकरण राबवावे.
  • कामाच्या ठिकाणच्या व्यवस्थापन किंवा सोसायट्यांचे सचिव यांनी निवडलेले खासगी लसीकरण केंद्र हे नोंदणीकृत आहे का, याची खातरजमा करावी.
  • खासगी लसीकरण केंद्र यांच्याशी समन्वय साधण्यासाठी सोसायटीचा सचिव हा ‘नोडल ऑफिसर’ म्हणून नियुक्त करावा नोडल ऑफिसरने सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावी.

(हेही  वाचा : आता जबाबदारी केंद्राची, मराठा आरक्षण द्यायचे कि नाही स्पष्ट करावे!)

सोसायट्याच्या नोडल ऑफिसरची जबाबदारी! 

  • ज्या खासगी लसीकरण केंद्राची निवड केली आहे, त्याची कोविन ऍप वर नोंदणी झाली आहे का, याची खात्री करावी.
  • सोसायटी आणि लसीकरण केंद्र यांच्यात रितसर करार झाला आहे का, हे पडताळणे.
  • सोसायटीच्या बैठकीत लसीची किंमत ठरवावी, त्याचे इतिवृत्त तयार करावे
  • लसीकरणाची तारीख, लसीची किंमत, लसीकरण केंद्राचे नाव याची माहिती बोर्डावर लिहिणे
  • प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष तयार करावे
  • लसीकरणाची तारीख, लसीची किंमत, लसीकरण केंद्राचे नाव ही सर्व माहिती महापालिका आणि स्थानिक पोलिस ठाण्याला ३ दिवस आधी द्यावी
  • जर काही चुकीची घटना लसीकरणाच्या ठिकाणी होत असेल तर तात्काळ पोलिस ठाण्याला कळवावे
  • लाभार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र मिळेल, याची व्यवस्था करावी
  • काहीही समस्या असल्यास महापालिकेची हेल्पलाईन १९१६ ला संपर्क करावा.

feat

खासगी लसीकरण केंद्रातील नोडल ऑफिसरच्या जबाबदाऱ्या! 

  • सोसायटी आणि लसीकरण केंद्र यांच्यात रितसर करार झाला आहे का, हे पडताळणे.
  • लसीकरणाची तारीख, लसीची किंमत, लसीकरण केंद्राचे नाव हे सर्व माहिती महापालिका आणि स्थानिक पोलिस ठाण्याला ३ दिवस आधी द्यावी
  • लसीकरण केंद्र आणि सोसायटी या ठिकाणी लसींची वाहतूक व्यवस्था, कोल्ड स्टोरेज व्यवस्था आहे का, हे पहावे
  • सर्वांचे लसीकरण हे कोविन ऍप वर नोंदणी होत आहे, याची खात्री करावी लाभार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र मिळेल, याची व्यवस्था करावी
  • सोसायटी येथे रुग्णवाहिका आहे का, तसेच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करून ठेवणे
  • लसीकरण करताना कोविन ऍप आणि गूगल शीट मध्ये लाभार्थ्यांची नोंदणी होत आहे का, याची पडताळणी करावी

 स्थानिक आरोग्य केंद्रातील नोडल ऑफिसरच्या जबाबदाऱ्या!

  • ज्या खासगी लसीकरण केंद्राची निवड करण्यात आली आहे, ते कोविन ऍप वर नोंदणीकृत आहे का, याची खात्री करावी
  • लसीकरण सुरु असताना अधूनमधून लसीकरणाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी

(हेही वाचा : मराठा आरक्षणावरील केंद्राची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.