मुंबई महापालिकेच्या कोविड रुग्णालय आणि कोविड सेंटर यासाठी ऑक्सिजन काँसेंट्रेटरची खरेदी करण्यात येत आहे. १० लिटर क्षमतेच्या १२०० ऑक्सिजन काँसेंट्रेटरची खरेदी केली जात असून यासाठी प्रति ऑक्सिजन काँसेंट्रेटरसाठी ७९ हजार रुपये मोजले आहे. परंतु ही किंमत प्रत्यक्षात बाजार भावापेक्षा प्रत्येकी ८ ते ९ हजार रुपये अधिक मोजले जात आहे. त्यामुळे कोविडच्या नावाखाली मोठी लूट सुरू असून प्रशासनाने ही खरेदी करून आता यासाठी कार्योत्तर मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव सादर केला आहे.
मध्यवर्ती खरेदी खात्याच्या वतीने खरेदी केली जाणारी वस्तू तथा साहित्य हे २५ टक्के अधिक दराने खरेदी केले जाते. ऑक्सिजन काँसेंट्रेटरच्या बाबतीतही तेच आहे. आम्ही रुग्णांची निकड आणि गरज लक्षात घेऊन ती तातडीने उपलब्ध व्हावी म्हणून दुर्लक्ष करतो. पण याचा अर्थ असा नाही की प्रशासनाने मनमानी करावी. या वस्तूंची खरेदी करायला हवी, पण तिजोरीचा विचार करून किमान बाजार भावापेक्षा अधिक खर्च होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराचा विचार न करता महापालिकेचा विचार करायला हवा. म्हणजे प्रशासनावरील टीका कमी होईल.
– रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापलिका
(हेही वाचा : मुंबईत आतापर्यंतच्या ‘मे’ महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस!)
चायना बनावटीचे हे ऑक्सिजन काँसेंट्रेटर आहेत.
मुंबई महापालिकेच्यावतीने ५ लिटर क्षमतेचे ३०० आणि १० लिटर क्षमतेचे १२०० ऑक्सिजन काँसेंट्रेटरची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर २० एप्रिल २०२१ रोजी निविदा मागवण्यात आली होती. त्यानुसार कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ३०० लिटर क्षमतेचे ऑक्सिजन काँसेंट्रेटरची खरेदी रद्द करून १० लिटर क्षमतेचे १२०० ऑक्सिजन काँसेंट्रेटर खरेदी करण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. यासाठी श्रद्धा डिस्ट्रीब्युटर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७९ हजार रुपयांमध्ये एक नग याप्रमाणे १२०० ऑक्सिजन काँसेंट्रेटरसाठी १० कोटी ४२ लाख रुपये मोजले जात आहे. चायना बनावटीचे हे ऑक्सिजन काँसेंट्रेटर आहेत. मुळात १० लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन काँसेंट्रेटरचा बाजारभाव हा ६५ ते ७० हजार एवढा आहे. त्या तुलनेत महापालिका हे ऑक्सिजन काँसेंट्रेटर ७९ हजार किंमतीला खरेदी केले जात आहेत. हा दर बाजार भावापेक्षा अधिक आहे.
Join Our WhatsApp Community