महापालिकेची ‘सॅप’ प्रणाली ९ ते २१ जुलैपर्यंत बंद राहणार! 

महानगरपालिकेच्या सॅप प्रणाली व्यतिरिक्त इतर ऑनलाईन सेवा या नेहमीप्रमाणेच सुरु राहणार आहेत.

महानगरपालिकेमध्‍ये वापरात असलेली ‘सॅप’ ही मूलभूत प्रणालीचे अद्ययावत करण्याचे कामकाज ९ जुलै ते २१ जुलै २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. तेवढा काळ ही प्रणाली बंद राहणार आहे.

याआधी कार्यवाही महिनाभर पुढे ढकललेली!

याआधी ११ जून ते २८ जून २०२१ पर्यंत हे अद्ययावतीकरणाचे कामकाज करण्याचे घोषित करण्यात आले होते. तथापि, अद्ययावतीकरण कालावधीदरम्यान सॅप प्रणाली बंद राहणार असल्याने, महानगरपालिकेच्या विविध खात्यांची तांत्रिक व निविदांविषयक पूर्तता करण्याची अडचण लक्षात घेऊन ही कार्यवाही एक महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार सुधारित वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. मुंबईकर नागरिकांना अद्ययावत व गुणवत्‍तापूर्ण नागरी सेवा-सुविधा पुरविण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका नेहमीच प्रयत्‍नशील असते. त्‍याचाच एक भाग म्‍हणून महानगरपालिकेमध्‍ये वापरात असलेली ‘सॅप मूलभूत’ प्रणाली आता ‘सॅप हाना’ या अद्ययावत आवृत्‍तीमध्‍ये अद्ययावत करण्‍यात येणार आहे. हे कामकाज ९ जुलै ते २१ जुलै २०२१ पर्यंत  करण्यात येणार आहे. या कालावधीत विद्यमान सॅप प्रणाली पूर्णपणे बंद राहणार आहे.

(हेही वाचा : खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित! जाणून घ्या किती… )

इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु असणार!

मात्र, महानगरपालिकेच्या सॅप प्रणाली व्यतिरिक्त इतर सेवा या नेहमीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी https://ptaxportal.mcgm.gov.in, जलदेयकांचा भरणा करण्याकरिता https://aquaptax.mcgm.gov.in, ऑनलाईन इमारत बांधकाम परवानगी अर्जासाठी https://autodcr.mcgm.gov.in ही संकेतस्‍थळे सुरु राहणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here