कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतः महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने प्रयत्न केले. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाजपचे आमदार योगेश सागर यांनी आक्षेप घेतला. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब मराठी विद्यार्थी शिकत असतात, त्यांना शिष्यवृत्तीची आवश्यकता असते. मात्र महापालिका प्रशासनाने शिष्यवृत्ती परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यावर आक्षेप घेत शिवसेना मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे, अशी टीका केली.
गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय!
राज्य सरकारने राज्यात कोरोना नियंत्रणात आला असल्याचा दावा केला आहे. तसेच मुंबई महापालिकेनेही कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आणला आहे, अशा परिस्थितीत शिष्यवृत्ती परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे मराठी भाषिक आणि इतर भाषिक गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. गरीब मुलांना खास करून मराठी भाषिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा न घेणे म्हणजे त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणे ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नीती असून त्याला शिवसेनेची साथ आहे, असेही आमदार योगेश सागर यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा : वर्षा गायकवाड शिक्षण खात्यात ‘नापास’?)
शिक्षक संघटनांनी परीक्षेला केला विरोध!
मुंबई मनपा आयुक्तांनी महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सुरक्षा आणि आरोग्याच्या कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यामध्ये इतर शाळांच्या विद्यार्थ्यांबाबत विचार केला नव्हता. शिक्षक परिषदेने याबाबत शासनाशी पत्रव्यवहार केला होता. सकाळपासून शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे मुंबई मनपा कार्यालयात जाऊन बसले होते. सर्वच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार व्हावा. याबाबत मागणी केली होती. याला यश आले आहे. सर्वच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे शिवनाथ दराडे म्हणाले.
Join Our WhatsApp Community