महापालिका उभारणार अत्याधुनिक कॅन्सर केअर सेंटर!

ही प्रोटोन थेरेपी सुरु करण्यासाठी या प्रकल्पासाठी मुंबईत जागा निश्चित करण्यात येत आहे.

मुंबईमध्ये कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकमेव परळमध्ये टाटा रुग्णालय असून महापालिकेच्या रुग्णालयांत या आजारांवर केमो थेरेपी करण्याच्या उपचार पध्दतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु आता महापालिकेच्या अत्याधुनिक कॅन्सर केअर सेंटरची स्थापना करण्यात येत आहे. या केअर सेंटरच्या स्थापनेसाठी महापालिकेच्यावतीने क्रसना डायग्नोस्टीक्स लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारचा प्रकल्प भारत प्रथमच केला जात आहे.

या प्रकल्पासाठी ३ एकर क्षेत्रफळाची जागा लागणार

महापालिकेच्या सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांकरता कर्करोगावरील अचूक व अत्यंत किफायतशीर दराने उपचार करून देण्यासाठी, अद्ययावत प्रोटॉनबीन थेरपी सुरु करण्याची महत्वाकांक्षी योजना महापालिकेने आखली आहे. कमीत कमी डोस देवून अधिकाधिक कर्करोगांच्या पेशी नष्ट करून, केमोथेरपीचे सर्व दुष्पपरिणाम टाळून शरीरातील इतर पेशींना न मारता फक्त कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणारी व केवळ ट्यूमरला लक्ष्य करणारी रेडीएशन प्रकारातील प्रोटोन थेरेपी ही कॅन्सरवर सर्वात अत्याधुनिक व प्रभावी उपचारपध्दती मानली जाते. ही प्रोटोन थेरेपी सुरु करण्यासाठी या प्रकल्पासाठी मुंबईत जागा निश्चित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ३ एकर क्षेत्रफळाची जागा लागणार असून हा प्रकल्प भारतात प्रथमच करण्यात येत असल्याने यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. केईएम रुग्णालयाच्यावतीने प्रस्तावासाठी विनंती अर्ज मागवण्यात आले होते. त्यामध्ये क्रसना डायग्नोस्टीक्स लिमिटेड यांची प्रकल्प सल्लागार म्हणून निवड झाली आहे. कॉम्पॅक्ट सिंगल रुम प्रोटोन थेरेपी सिस्टीमसह, स्पेक्ट गामा कॅमेरासह पेट-सीटी, एचडीआर ब्रॅकीथेरेपीसह एलआयएनआयएलसी, एमआरआय, १२८ स्लाईस सीटी, मॅमोग्राफी, सोनोग्राफीर्, पॅथोलॉजी, डोटा ऍनालिसिसस सेंटरसह केमोथेरेपी ज्यात बंकर सुविधा बांधणे आणि टर्न की बेसीसवर सहायक बांधकामे करणे आदींच्या बांधकामांसह महापालिकेच्या अत्याधुनिक कॅन्सर केअर सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे.

(हेही वाचा : म्हाडाकडून मराठी भाषिकांचा द्वेष! अर्जात घातली ‘ही’ अट, शिवसेना टार्गेट)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here