सुप्त क्षयरोगाला आळा घालण्यासाठी चाचणीचा कोरोना फॉर्म्युला

क्षयरोग प्रसारास प्रतिबंध करून ‘सन – २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत’ करण्याच्यादृष्टीकोनात महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

96

सुप्त क्षयरोग (टीबी) संसर्गास आळा तथा प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने एक विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या टीबीच्या रुग्णांचा अधिकाधिक शोध घेण्यासाठी आता कोरोनाचा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईतील क्षयरोग रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची मोहीम स्वरुपात चाचणी करण्यात येणार आहे. ज्याप्रकारे कोरोनाबाधित रुग्णांच्या अति संपर्कातील लोकांचा शोध घेवून त्यांची चाचणी करण्यात येते, त्याचधर्तीवर आता क्षयरोग रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांची चाचणी करण्यात येणार आहे. क्षयरोग प्रसारास प्रतिबंध करून ‘सन – २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत’ करण्याच्यादृष्टीकोनात महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

सुप्त क्षयरोग संसर्गाचे मापन, विश्लेषण करणाऱ्या प्रकल्पाची सुरुवात

मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या उपस्थितीत सुप्त क्षयरोग संसर्गाचे मापन व विश्लेषण करणाऱ्या सदर प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला मुंबईच्या शहर क्षयरोग अधिकारी तथा संबंधित प्रकल्पाच्या मुख्य अन्वेषक डॉ. प्रणिता टिपरे, ‘शेअर इंडिया’ या संस्थेचे प्रमुख डॉ. विजय येळदंडी, प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सतीश कैपिल्यवार, ‘सीडीसी इंडिया’ या संस्थेच्या डॉ. मेलिसा न्येंदक, ब्रायन कोलोडझिएस्की, लोकेश उपाध्याय, डॉ. राजेश देशमुख व डॉ. क्रिस्टीन हो हे मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्याचबरोबर शेअर इंडिया या संस्थेच्या चमुतील डॉ. संपदा भिडे, डॉ. निकुंज फोफानी, फातिमा खान यांच्यासह मुंबई महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी व कर्मचारी देखील या कार्यक्रमाला ‘ऑनलाईन’ पद्धतीने उपस्थित होते.

(हेही वाचा : सहाय्यक आयुक्तांकडून आमदारांची पाठराखण, अभियंत्यांचे खच्चीकरण)

क्षयरोग रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली जाणार  

सुप्त क्षयरोग संसर्ग मापन प्रकल्पामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील क्षयरोग विरोधातील लढ्यास बळ मिळेल आणि क्षयरोग मुक्त मुंबईच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच हा उपक्रम क्षयरोग संसर्गास आळा घालण्यासह क्षयरोग निर्मूलनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. तर शेअर इंडिया या संस्थेचे प्रमुख डॉ. विजय येळदंडी यांनी या कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात क्षयरोग विषयक ‘आयजीआरए’ ही वैद्यकीय चाचणी करण्यासाठी आवश्यक ती प्रयोगशाळा स्थापन करणे, त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे इत्यादी बाबींसाठी त्यांची संस्था महानगरपालिकेला सहकार्य करेल, असे सांगितले. ‘सीडीसी इंडिया’ या संस्थेच्या डॉ. मेलिसा न्येंदक यांनी उद्बोधन या प्रकल्पांतर्गत क्षयरोग रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व घरातील व्यक्तींची सुप्त क्षयरोग संसर्गासाठी तपासणी केली जाणार आहे. या तपासणी दरम्यान सुप्त क्षयरोगाची बाधा आढळून आल्यास राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार व निर्धारित वैद्यकीय उपचार क्रमानुसार बाधित व्यक्तींवर उपचार करण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल. तसेच सक्रीय क्षयरोग असणा-या रुग्णांवर देखील निर्धारित औषधोपचार केले जातील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.