- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत गुरूवारी ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात, तर बुधवारी ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावातील पाणी साठा कमी होत असल्याने राज्य शासनाने महापालिकेला राखीव साठा देण्याचे मान्य केले, त्यामुळे यंदा पाणीकपात येणार नाही असे जाहीर करणाऱ्या महापालिका प्रशासनाने अखेर ही कपात जाहीर करून आपल्या नियोजन शून्य कारभाराचे दर्शन घडवले आहे. (BMC)
सन २०२१ आणि २०२२ या दोन वर्षात दिनांक १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय होता. मात्र सन २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. (BMC)
शनिवारी २५ मे २०२४ रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या फक्त ९.६९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. (BMC)
एवढेच नव्हे तर, भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर (Mumbai) नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे, यंदा पावसाचे वेळेवर आगमन होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. (BMC)
(हेही वाचा- Cyclone Remal : १०२ किमी वेगानं येतंय चक्रीवादळ! ‘या’ राज्यांमध्ये तुफान पाऊस, हवामान विभागाचा इशारा)
असे असले तरी, अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व पैलूंचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने ही पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC)
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे (Thane Municipal Corporation), भिवंडी-निजामपूर महानगरपालिका (Bhiwandi-Nizampur Municipal Corporation) व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही ५ टक्के आणि १० टक्के कपात अनुक्रमे या दिनांकापासून लागू राहणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे. (BMC)
मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे विनम्र आवाहन देखील महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (BMC)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community