BMC : महापालिका आयुक्तांचा बोरीवलीत रस्ते पाहणीचा पर्यटन दौरा, त्या रस्त्यांकडे दुर्लक्षच!

890
BMC : महापालिका आयुक्तांचा बोरीवलीत रस्ते पाहणीचा पर्यटन दौरा, त्या रस्त्यांकडे दुर्लक्षच!
BMC : महापालिका आयुक्तांचा बोरीवलीत रस्ते पाहणीचा पर्यटन दौरा, त्या रस्त्यांकडे दुर्लक्षच!
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

बोरिवली विभागात रस्ते विभागामार्फत सुरु असलेली रस्‍ते विकासाची कामे प्राधान्याने व जलद गतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत,असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी महापालिका रस्ते विभागासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. परंतु सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करता चिकुवाडीतील रस्ते आणि अनिल देसाई मार्गावरील (Anil Desai Marg) रस्त्याची जी कामे निकृष्ट दर्जाची होत आहे, त्यावरील काँक्रिट वाहून गेले आहे, त्या रस्त्यांची पाहणी करण्याची ना हिंमत दाखवली ना या रस्त्यांच्या कंत्राटदारांना पुन्हा हे रस्ते बनवून देण्याचे निर्देश दिले गेले. त्यामुळे आयुक्तांची बोरीवलीमधील रस्त्यांची पाहणी ही केवळ पर्यटन होते का असेच बोलले जात आहे.

WhatsApp Image 2024 12 26 at 8.34.44 PM

मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी गुरुवारी २६ डिसेंबर २०२४ बोरिवली येथील आर मध्य विभाग अंतर्गत सुरू असलेल्‍या व पूर्ण झालेल्या विविध विकास कामांची स्थळ पाहणी केली. त्‍यानंतर, आर मध्‍य विभाग कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्‍यावेळी ते बोलत होते. उप आयुक्‍त (परिमंडळ ७) डॉ. भाग्‍यश्री कापसे, सहायक आयुक्‍त (आर मध्‍य विभाग) संध्‍या नांदेडकर यांच्‍यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा – CC Road : चिकूवाडीतील जॉगर्स पार्क रस्ताच चार महिन्यांत गेला वाहून, हेच का सिमेंट काँक्रिटचे दर्जेदार काम?)

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेण्‍यात आला आहे. रस्‍ते विकास कामे दर्जेदार आणि अत्युच्च गुणवत्‍तापूर्ण होण्‍यासाठी महानगरपालिका अधिकारी – अभियंत्‍यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. विकास कामे सुरू असताना नागरिकांची गैरसोय होता कामा नये, यावर अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. बोरिवली पश्चिम येथील ‘आर.डी.पी-१०’ या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. पावसाळ्यापूर्वी रस्‍ते विकासाची कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश यावेळी गगराणी (Bhushan Gagrani) यांनी दिले.

WhatsApp Image 2024 12 26 at 8.34.44 PM 1

बोरिवली (पूर्व) भागात पश्चिम रेल्वे परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्‍याच्‍या तक्रारीची दखल घेत महानगरपालिका आयुक्‍त गगराणी यांनी या परिसरास भेट दिली. पावसाळी पाण्याचा निचरा करण्याकरीता पर्जन्य जलवाहिन्‍या विभागामार्फत प्रस्तावित कामांची माहिती घेतली. पर्जन्‍य जलवाहिनी विभागातर्फे हाती घेण्यात आलेल्या कामाचा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी जलद गतीने पूर्ण करावा, असे स्‍पष्‍ट निर्देश गगराणी (Bhushan Gagrani) यांनी दिले.

(हेही वाचा – CC Road : अनिल देसाई मार्ग गेला खड्ड्यात)

आर मध्य विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेल्या गोराई जेट्टी मार्ग, पंगत हॉटेल समोर महात्मा फुले झोपडपट्टी निष्कासनानंतर करण्यात आलेले रस्‍ता रुंदीकरण आणि उद्यान विकसित कामांची महानगरपालिका आयुक्‍त गगराणी यांनी पाहणी केली. बोरिवली पश्चिम येथे सुरू असलेल्या भारतरत्‍न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम उद्यानाच्या सुधारणा कामाचे गगराणी यांनी कौतुक केले. उद्यानातील अॅथलॅटिक ट्रॅक, सुशोभीकरण कामे इतरांसाठी अनुकरणीय असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. लालजी त्रिकमजी मुंबई पब्लिक स्कूल या शाळेला भेट देत महानगरपालिका आयुक्‍त गगराणी (Bhushan Gagrani) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तत्पूर्वी त्यांनी नागरी सुविधा केंद्राला भेट देत नागरिकांसमवेत संवाद साधला. तसेच, नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

हेही पहा –

youtube.com/watch?v=Ac5-WzsZSk0&t=3s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.