कोविड १९च्या विषाणूचा प्रार्दुभाव चिनमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने, पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. चिनमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या या आजारानंतर देशाच्या आरोग्य यंत्रणेनेही विविध राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, मुंबई महापालिकेनेही आता केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच कोविड रोखण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोविडचा आजार वाढू नये यासाठी प्रयत्न करताना जर याचा प्रार्दुभाव वाढल्यास त्यासाठी आवश्यक त्या उपचारासाठी रुग्णालय आणि कोविड सेंटर पुन्हा उभारण्याची पूर्ण तयारी महापालिकेकडे असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबईत डिसेंबर २०२१ पासून कोविडच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुढे टप्प्याटप्प्याने कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. काही कोविड सेंटर हे रुग्ण दाखल नसल्याने कोविड लसीकरणासाठी सुरु ठेवण्यात आले आहेत. परंतु आता सर्व कोविड सेंटर बंद करण्यात आले असून, या सेंटरच्या साहित्यासह वैद्यकीय उपकरणे व ऑक्सिजन सेंटरची सामृग्री ही सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वर्तवण्यात आल्यानंतर मुंबई महापालिका यासाठी सज्ज असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. सध्या परदेशातून किंवा अन्य राज्यांमधून हवाईमार्गे येणाऱ्यांवर बंदी असून, मास्कची बंदी नाही. मात्र, या आजाराची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी स्वत:च मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केला. मात्र, ही एैच्छिक बाब नसेल, असेही आरोग्य विभागाने म्हटले.
‘कोविड – १९’ विषाणूच्या जिनोम सिक्वेंसिंग करता मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयासह राज्यात सात प्रयोगशाळा आहेत. या कस्तुरबा प्रयोगशाळेची ३७६ नमुने तपासणीची क्षमता असून सध्या ५ ते ६ नमुन्यांचीच तपासणी होत आहे. त्यामुळे राज्यातील इतर शहरांमधील नमुने गोळा करून एकत्र तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठवल्यास अतिरिक्त सुविधा उपलब्ध होईल, जेणेकरून व्हेरीएंट शोधणे सोपे जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community