-
सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेने सध्या अडीच लाख कोटींच्या प्रकल्पांचे कामे हाती घेतली असून यातील बहुतांशी प्रकल्प कामे ही शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे या प्रकल्पांसाठी मोठ्याप्रमाणात खर्च होण्याची शक्यता असून त्यातुलनेत महापालिकेच्या महसुलात कोणतीही वाढ नसल्याने आता महापलिका प्रशासन उत्पन्न वाढीच्यादृष्टीकोनातून विचार करत आहे. यासाठी महापालिकेचे वापरात नसलेले भूखंड भाडेकरारावर देवून त्यातून महसूल वाढीचा प्रयत्न सुरु केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसह वरळीतील अस्फाल्ट प्लांट अणि मलबार हिल येथील बेस्टचे रिसिव्हींग स्टेशनच्या जागांचा समावेश असून या जागा भाडेकरारवर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्यावतीने स्वारस्य अभिरुची अर्ज मागवले आहेत. त्यानुसार जागांची बोली लावून या जागांचा लिलाव केला जाणार आहे. (BMC)
(हेही वाचा- मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’ जयघोष केल्याने धार्मिक भावना दुखावत नाहीत; Karnataka High Court चा निर्णय)
मुंबई महापालिका प्रशासनाने आता उत्पन्न वाढीचा विचार करत काही विनावापर असलेल्या आणि भविष्यात ज्या जागांची महापालिकेला गरज नाही असे भूखंड भाडेकरार पट्ट्यावर देऊन त्यातून महसूल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन भूखंड लिलाव पध्दतीने भाडेकरारावर देण्यासाठी स्वारस्य अभिरुची अर्ज मागवण्या आलेले आहे. यामध्ये ए विभागातील छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेचा समावेश आहे. येथील मंडई पाडण्यात आली असून यातील मच्छिमार गाळेधारकांना क्रॉफर्ड मार्केंटमधील जागेमध्ये कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेवर मंडईची बांधकाम केले जाईल असे सांगितले जात होते. परंतु सध्या या जागेवर महापालिकेच्यावतीने कोणतेही बांधकाम केले जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. या जागेवर मंडई आणि महापालिका कार्यालय असे आरक्षण आहे. परंतु ही जागा भाडेकरारावर दिल्यानंतर यावरील आरक्षण पूर्णपणे काढून टाकले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जी व्यक्ती ही जागा भाडेकरारावर घेईल ते निवासी किंवा वाणिज्य वापरासाठी बांधकाम करू शकतात. यामध्ये मॉलचे बांधकाम करू शकतात,असे बोलले जात आहे. (BMC)
तर सध्या मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येत असल्याने रस्त्यांच्या बांधकामासाठी डांबराचा वापर कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेचा अस्पाल्ट प्लांट च्या जागेचा वापर कमी होणार आहे. त्यामुळे या जागेचा काही भाग हा भाडेकरारवर देऊन उर्वरित भाग लॅब करता ठेवणे असं निश्चित करण्यात आले. तर मलबार हिल येथील एका जागेवर बेस्ट रिसीविंग स्टेशन आहे. या रिसिव्हिंग स्टेशनच्या आकार कमी करून यातील काही भाग भाडेकरारवर देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. हे तिन्ही भूखंड सध्या विना वापर पडून असल्याने महापालिकेने हे भूखंड भाडेकरारावर देऊन यातून महापालिकेला अधिकाधिक महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी मागवलेल्या स्वारस्य अभिरुची अर्जाद्वारे महापालिकेला या भूखंडातून किती निधी प्राप्त होऊ शकतो, याचा अंदाज येईल. आणि त्यानुसार महापालिका त्या भूखंडासंदर्भात रक्कम निश्चित करून लिलावाची रक्कम ठरवणार आहे, अशी माहिती मिळत आहे. (BMC)
भाडेकरारावर कोणत्या जागांचा होणार लिलाव
महापालिका डि विभागातील बेस्ट रिसिव्हींग स्टेशन, सीएस क्रमांक ४३९(अंशत 🙂
जागेचे क्षेत्रफळ : सुमारे २४०० चौरस मीटर
वरळी अस्फाल्ट प्लांट, सीएस क्रमांक १६२९ (अंशत 🙂
जागेचे क्षेत्रफळ : निश्चित करण्यात आलेले नाही
महापालिका ए वॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सीएस क्रमांक १५००
जागेचे क्षेत्रफळ : ८६०० चौरस मीटर
हेही पहा-
Join Our WhatsApp Community