BMC : पालकमंत्रीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने पाच आमदारांना महापालिकेचा निधी

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असल्याने मुंबईतील विकासकामांना गती मिळावी म्हणून शहर व उपनगरांचे पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार विकासकामांसाठी आमदारांना निधी उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक प्रशासनाच्यावतीने काढण्यात आले.

1124
Goregaon Film City Road : गोरेगावमधील फिल्मसिटी मार्गावर पुन्हा वाढले फेरीवाले, मे महिन्यात घडला होता तो प्रकार
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिकेचा (BMC) निधी आमदारांना दिल्याबददल जोरदार चर्चा असून पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसारच प्रशासकांनी लोकप्रतिनिधींनी निधी दिल्याचे सांगितले जाते. परंतु शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्या शिफारशीशिवायही पाच आमदारांना प्रशासकांनी निधी मंजूर करून दिला आहे. या चार आमदारांची शिफारस करणारी दुसरी तिसरी कुणी व्यक्ती नसून खुद्द राज्याचे मुख्यमंत्रीच आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार भाजपचे दोन आणि शिवसेनेच्या तीन आमदारांना विकासकामांसाठी महापालिकेचा (BMC) निधी उपलब्ध झाला असल्याची बाब माहिती अधिकारातून हिंदुस्थान पोस्टला प्राप्त झाली आहे. (BMC)

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असल्याने मुंबईतील विकासकामांना गती मिळावी म्हणून शहर व उपनगरांचे पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार विकासकामांसाठी आमदारांना निधी उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक प्रशासनाच्यावतीने काढण्यात आले. या परिपत्रकानुसार शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सहा आमदारांच्या विकास कामांच्या निधीकरता शिफारस केली आहे, तर उपनगराचे पालकमत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी १० आमदारांच्या विकासकामांच्या निधीकरता शिफारस केली आहे. त्यानुसार प्रशासकांनी त्यांच्या प्रस्तावित सर्व विकासकामांच्या कामांची व मंजुरीची पूर्तता केल्यानंतर त्यांना निधी मंजूर करून दिला आहे. मात्र, २१ आमदारांपैकी १६ आमदारांची शिफारस ही दोन्ही पालकमंत्र्यांनी केली असली तरी पाच आमदारांची शिफारस ही खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली असल्याची माहितीच माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे. हिंदुस्थान पोस्टने माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये दहिसरमधील आमदार मनिषा चौधरी, मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे, वर्सोव्याचा आमदार डॉ. भारती लव्हेकर, चांदिवलीतील आमदार दिलीप लांडे आणि कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना महापालिकेचा निधी देण्याची शिफारस ही मुख्यमंत्र्यांची आहे. (BMC)

(हेही वाचा – Best Wushu Players in the World : वुशू खेळातील जागतिक दर्जाचे ‘हे’ खेळाडू तुम्ही ओळखता का?)

यासर्व २१ आमदारांना आतापर्यंत ५७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या आमदारांमध्ये सर्वांत अधिक निधी हा डॉ भारती लव्हेकर, राम कदम, पराग शाह आदी आमदारांना प्रत्येकी ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, तर सर्वांत कमी निधी हा चारकोपमधील आमदार योगेश सागर यांना मंजूर झाला आहे, त्यांना केवळ १३. ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आधी मुख्यमंत्र्यांनी आमदारांना निधी देण्यासंदर्भात शिफारस केली आणि त्यानंतरच प्रशासनाने याचे परिपत्रक काढले असे स्पष्ट होत आहे. (BMC)

मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या आमदारांना मंजूर झालेला निधी
  •  दहिसरमधील आमदार मनिषा चौधरी : २८ कोटी रुपये
  • मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे : २५ कोटी रुपये
  • वर्सोव्याचा आमदार डॉ. भारती लव्हेकर : ३५ कोटी रुपये
  • चांदिवलीतील आमदार दिलीप लांडे : सुमारे २४ कोटी रुपये
  • कुर्ल्यातील आमदार मंगेश कुडाळकर : ३५ कोटी रुपये (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.