मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमधील वाहतूक नियंत्रण प्रणाली नव्याने बसवण्यात येत असून संपूर्ण मुंबईतील २८ प्रमुख रस्त्यांवर ही सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या २८ रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणेकरता ०९ कोटी ७० लाख रुपये खर्च केले जाणार आहे.
मुंबईतील शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील विविध वाहतूक नाक्यांवर पारंपरिक नवीन वाहतूक नियंत्रण नियंत्रण प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शहरातील ८ रस्ते आणि पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रत्येकी १० रस्त्यांवरील प्रमुख जंक्शनवर ही नवीन सिग्नल बसवण्यात येत आहे. यासाठी पूर्व उपनगरांमधील १० रस्त्यांवरील नाक्यांवर सिग्नल बसवण्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपये खर्च केले जाणार असून यासाठी केरला स्टेट इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची कंपनीची निवड करण्यात आली आहे.
तर शहरातील ०८ रस्त्यांवरील नाक्यांवर सिग्नल बसवण्यासाठी २ कोटी २८ लाख रुपये खर्च करण्यासाठी सीएमएस कॉम्प्युटर्स लिमिटेडची निवड करण्यात आली आहे, तर पश्चिम उपनगरांतील १० रस्त्यांवरील नाक्यांवर सिग्नल बसवण्यासाठी ३ कोटी २२ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या भागातील सिग्नल बसवण्यासाठी ट्रॅफिटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
(हेही वाचा Gyanvapi Case : ‘औरंगजेब क्रूरही नव्हता ना त्याने विश्वेश्वराचे मंदिर तोडले…’, मशीद समितीचा न्यायालयात दावा)
‘या’ मार्गावरील वाहतूक जंक्शनवर बसवणार नवीन सिग्नल
- पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पंप हाऊस जंक्शन
- जिजामाता रोड आणि इंजेर नगर मार्ग (जिजामाता चौक) आघाडी नगर जंक्शन, अंधेरी (पूर्व)
- पवई सरोवर को. ऑ.हौ.सो. आणि आदी शंकराचार्य मार्ग जंक्शन, पवई पोलिस स्टेशन जवळ, पवई
- मरोळ को. ऑ. रोड आणि अंधेरी कुर्ला रोड टाईम्स स्क्वेअर बिल्डींग, (सागबाग जंक्शन) मरोळ, अंधेरी (पूर्व)
- मकवाना रोड आणि अंधेरी कुर्ला रोड (सुनी मस्जिद जवळ), अंधेरी (पूर्व)
- लालवहादुर शास्त्री मार्गावरील टॅक्सीमन कॉलनी गेट नं १ आणि सुलेमान बिल्डिंग जंक्शन (कुर्ला (पश्चिम)
- वीर जिजामाता भोसले मार्गावरील न्यू म्हाडा वसाहत जंक्शन (गोरेगांव मुलुंड लिंक मार्ग),गोवंडी
- वीर जिजामाता भोसले मार्गावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर जंक्शन (गोरेगांव-मुलुंड लिंक मार्ग), गोवंडी
- गोरेगांव मुलुंड लिंक मार्ग आणि राघवेंद्र स्वामी मार्ग जंक्शन, पूजा हॉटेल, मुलुंड (पश्चिम)
- सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवरील हॉटेल ग्रँड हयात आणि युनिव्हसिटी जंक्शन नं. २ विस्तारीत सांताक्रुझ (पूर्व)
- पश्चिम द्रुतगती महामार्गावरील केतकीपाडा जंक्शन, दहिसर चेक नाक्याजवळ, दहिसर (पूर्व)
- पश्चिम द्रुतगती महामार्गावरील रावळपाडा जंक्शन, दहिसर (पूर्व)
- पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि संत ज्ञानेश्वर मार्ग जंक्शन बोरीवली (पूर्व)
- पश्चिम द्रुतगती महामार्गावरील नॅशनल पार्क आणि महात्मा गांधी मार्ग जंक्शन व विस्तारीत कुलुपवाडी जंक्शन, बोरीवली (पूर्व)
- आकुर्ली रोड आणि समतानगर पोलिस स्टेशन जंक्शन, कांदिवली (पूर्व)
- गोरेगांव मुलुंड लिंक मार्गवरील लकी ईराणीवाडी जंक्शन, गोरेगाव (पुर्व)
- गोरेगांव मुलुंड लिंक मार्गावरील वसंत व्हॅली रोड (मल्लिका हॉटेल रोड) जंक्शन, महानगर गॅस पेट्रोलपंप जवळ, गोरेगाव (पूर्व)
- गोरेगांव मुलुंड लिंक मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गोरेगाव (पूर्व)
- बी. ई. एस. टी रोड आणि लिंक रोड, मेगा मॉल जंक्शन, ओशिवरा (पश्चिम)
- जे.पी. रोड आणि स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी (पूर्व)