‘द मुंबई झू’ वरून करा राणीबागेची सफर

115

जागतिक चिमणी दिवस (२० मार्च) व जागतिक वन दिन (२१ मार्च) या दोहोंचे औचित्य साधून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या ‘व्हर्चुअली वाईल्ड’ या आभासी सफर मालिकेतील चौथ्या भागाचे अनावरण सोमवारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या आभासी मालिकेचे सर्व भाग ‘द मुंबई झू’ या यूट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

( हेही वाचा : पाण्याच्या टाक्या डास अळीमुक्त करण्यासाठी ४० दिवसांची डेडलाईन )

शतकोत्तर हीरक महोत्सव

१९ नोव्हेंबर १८६२ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी या ऐतिहासिक घटनेला तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला १६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमातून साजरा करण्याचे योजिले आहे.

विविध सुविधांचे लोकार्पण

उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसरामध्ये जमा होणाऱ्या पालापाचोळ्यापासून गांडूळ खत निर्मिती केली जाते. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने, हे खत आता नागरिकांना खरेदी करता येण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तर, बागेत बसण्यासाठी नवीन बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही सुविधांचे लोकार्पण देखील अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी, उपअधीक्षक (पशुवैद्यकीय) डॉ. कोमल राऊळ तसेच प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.