कोविडच्या चाचणी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआरच्या प्रयोगशाळेची स्थापना आता कूपर रुग्णालयात करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून तसे झाल्यास आरटीपीसीआर चाचणीसाठी महापालिकेची प्रयोगशाळा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी महापालिकेने कस्तुरबा रुग्णायलात अत्याधुनिक प्रयोगशाळा बनवण्यात आली होती, पण त्यानंतर केईएम, शीव येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळा बनवण्यात आली आहे. त्यानंतर आता कूपर रुग्णालयात आरटीपीसीआरची लॅब बनवली जात आहे.
आरटीपीसीआर प्रयोगशाळेची तरतूद
विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय येथे अत्याधुनिक तसेच अधिक निदान प्रयोगशाळेची रचना, विकास आणि चाचणी करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मॅक एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी १ कोटी ६५ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीव शास्त्र प्रमुखांच्या विनंतीनुसार आरटीपीसीआर प्रयोगशाळेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या जागेची पाहणी करून ती निश्चित करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या उपकरणांची मागणी मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
( हेही वाचा : शिमग्याक चला! कोकणासाठी एसटीने सोडल्या विशेष गाड्या )
कोविड काळात पश्चिम उपनगरातील कूपर रुग्णालयात कोविड रुग्णांना महापालिकेने सेवा उपलब्ध करून दिली होती. एमबीबीएस प्रवेशासाठी किमान मानकांमध्ये योग्य ते बदल बीएसएल २ पातळीची प्रयोगशाळा बनवण्यास सर्व विद्यालयांच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने मान्यता दिली. ज्यामुळे संसर्ग जन्य रोगांची चाचणी सुविधा उपलब्ध होईल तसेच बीएसएल-२, प्रयोगशाळा कोविड १९च्या रोगांच्या चाचणीसाठीही अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community