महानगरपालिकेच्या सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांना आता एकाच ठिकाणी दैनंदिन कामकाजाची उपयुक्त माहिती मिळावी. तसेच प्रशासनालाही एकाच व्यासपीठावरुन सर्व कर्मचाऱ्यांसमवेत एकाचवेळी संवाद साधणे शक्य व्हावे यासाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी समर्पित, स्वतंत्र संकेतस्थळाचे अनावरणही अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते बुधवारी झाले. mybmcemp.mcgm.gov.in या नावाने हे अंतर्गत वापराचे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे.
( हेही वाचा : डिजिटल सेवांकरता महापालिकेचे ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी व्हिजन २०२५ )
महानगरपालिका कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधण्यासाठी हमखास पर्याय म्हणून हे संकेतस्थळ उपयोगात येणार आहे. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या सूचना, निर्देश, घोषणा, नियोजित उपक्रम, प्रकल्प, कार्यक्रम यांची माहिती, विविध खात्यांची परिपत्रके, प्रशिक्षण कार्यक्रम, महत्त्वाची धोरणे, छायाचित्रे, उपयुक्त व सहायकारी ठरणाऱ्या चित्रफिती अशी निरनिराळी वैशिष्ट्ये यामध्ये समाविष्ट आहेत. एवढेच नव्हे तर मायबीएमसी मोबाईल ऍप, बीएमसी ऑन मॅप्स् यासारख्या सुविधांची सविस्तर माहिती आणि खास कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणारे चॅटबॉट देखील यामध्ये समाविष्ट आहे.
मुंबईकर नागरिकांसाठी डिजीटल सेवा-सुविधा उपलब्ध करुन देत असताना महानगरपालिकेचा गाडा हाकणाऱ्या सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांसाठी देखील आता समर्पित, स्वतंत्र असे संकेतस्थळ माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केले आहे. mybmcemp.mcgm.gov.in या नावाने हे अंतर्गत वापराचे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले असून त्याचेही अनावरण अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते बुधवारी झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारी सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी संचालक (माहिती तंत्रज्ञान) शरद उघडे यांच्यासह माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य विश्लेषण अधिकारी शुभेंद्र कानडे, व्यवस्थापक राजेंद्र फणसे, अमीत गडेकर, अरुण चव्हाण, सहायक अभियंता डेनीस फर्नांडिस, सहायक अभियंता मीनल शेट्ये हे याप्रसंगी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community