मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेतंर्गत हाती घेण्यात आला असून यासाठी या पुनर्विकासासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आल्यानंतर आता महापालिकेने या प्रकल्पांचे काम सल्लागाराच्या देखरेखीखाली करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची निवड केली आहे. या सल्लागाराच्या शुल्कावर तब्बल ३३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केले
मुंबईतील शहरांसह उपनगरांमध्ये महापालिका सफाई कामगारांच्या एकूण ४६ वसाहती आहेत. यामध्ये सध्या ५५९२ सफाई कामगार सेवा निवासस्थान म्हणून वापर करत आहे. या सेवा निवास्थानाच्या सदनिका या १५० चौरस फुटांच्या असून आता नव्याने करण्यात येणाऱ्या पुनर्विकासामध्ये या सदनिकांचा आकार ३०० आणि ६०० चौरस फुटांएवढा केला जाणार आहे.
या ४६ पैकी ३९ वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेतंर्गत करण्यात येणार होते, त्यानुसार यातील ३५ ठिकाणांवरील वसाहतींचा पुनर्विकासाचे आश्रय योजनेतंर्गत प्रस्तावित होता, परंतु त्यातील ३० ठिकाणच्या वसाहतींचे प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केले आहे. या प्रकरणांमध्ये भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप सत्ताधारी शिवसेनेनेवर केले होते. या ३० ठिकाणच्या वसाहतींच्या पुनर्विकासात ३०० व ६०० चौरस फुटांच्या सुमारे १२ हजार ४७९ सदनिकांचे बांधकाम केले जाणार आहे.
सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकासाचे हाती घेतलेले काम…
वसाहत : दादर गौतम नगर, शीव रावळी कॅम्प, सरदार नगर, कल्पक प्लॉट, एन.एम.जोशी मार्ग, शिश महाल, माहिम प्लॉट
- प्रस्तावित सदनिका : ३०० चौरस फूट – २१३४, ६०० चौरस फूट- ३१७
- प्रकल्प व्यावस्थापक सल्लागार : रुद्राभिषेक एंटरप्रायझेस
- सल्लागार शुल्क : ८.५८ कोटी रुपये
वसाहत :पी.एल लोखंडे मार्ग
- प्रस्तावित सदनिका : ३०० चौरस फूट – ७९४, ६०० चौरस फूट- १७४
- प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार : स्कायलाईन आर्किटेक्टस
- सल्लागार शुल्क : २.२१ कोटी रुपये
वसाहत : गोरेगाव जे पी नगर, कांदिवली आकुर्ली रोड, बोरीवली बाभई नाका
- प्रस्तावित सदनिका : ३०० चौरस फूट – ३१७, ६०० चौरस फूट- ६०
- प्रकल्प व्यावस्थापक सल्लागार : पेन्टॅकल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड
- सल्लागार शुल्क : १.६३ कोटी रुपये
वसाहत : गोरेगाव प्रगती नगर, मिठा नगर
- प्रस्तावित सदनिका : ३०० चौरस फूट – १३७१, ६०० चौरस फूट- १४७
- प्रकल्प व्यावस्थापक सल्लागार : स्थापती डिझायनर्स आणि कन्सल्टंट
- सल्लागार शुल्क : ४.९७ कोटी रुपये
वसाहत : अंधेरी यारी रोड, ए बी नायर रोड, जुहू गल्ली, खार न्यू हसनाबाद लेन
- प्रस्तावित सदनिका : ३०० चौरस फूट – १८४४, ६०० चौरस फूट- १४४
- प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार : स्थापती डिझायनर्स अँड कन्सल्टंट
- सल्लागार शुल्क : ८.५९ कोटी रुपये
वसाहत : देवनार संक्रमण शिबिर, चेंबूर बामणवाडी सिंधी सोसायटी,
- प्रस्तावित सदनिका : ३०० चौरस फूट – ६२१, ६०० चौरस फूट- ५६
- प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार :ईपिकॉन कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड
- सल्लागार शुल्क : २.४३ कोटी रुपये
वसाहत : घाटकोपर चिराग नगर, कुर्ला लायन्स गार्डन, भांडुप आम्रपाली बिल्डींग
- प्रस्तावित सदनिका : ३०० चौरस फूट –८५५, ६०० चौरस फूट- ६४
- प्रकल्प व्यावस्थापक सल्लागार : आर्किनोव्हा डिझाईन इनकॉर्पोरेट
- सल्लागार शुल्क : ३.४४ कोटी रुपये