नवरात्रौत्सवाच्या ऑनलाईन परवानगीला प्रारंभ

गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सव मंडळांनाही ऑनलाईन परवानगी दिली जाणार असून या ऑनलाईन परवानगीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. या परवानगी अर्जांकरता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी नवरात्रौत्सवाच्या परवानगीकरता मंडळांना १०० रुपयांचे शुल्क आकारले जात होते. परंतु यंदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे शुल्क माफ करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिल्याने परवानगीकरता कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

( हेही वाचा : गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रौत्सवातही भाजप करणार शिवसेनेची कोंडी )

अर्ज २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत स्वीकारले जाणार

येत्या २६ सप्टेंबर रोजी घटस्थापना असून नवत्रौत्सव सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने नवदुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. तर अनेक ठिकाणी माँ दुर्गा मातेच्या फोटोचे पुजन केले जाते. नवरात्रौत्सवाकरता मंडप उभारण्याकरता महापालिकेच्यावतीने परवानगी दिली जाते. महापालिकेच्या माध्यमातून एक खिडकी योजनेतंर्गत वाहतूक पोलिस व पोलिसांसह महापालिकेची परवानगी दिलीर जाते. याकरता गणेशोत्सवाप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मंडळांना देण्यात आली आहे. या परवानगीकरता १५ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत असून हे अर्ज २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. या परवानगीकरता कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून मंडळांनी ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याचे आवाहन परिमंडळ दोनचे उपायुक्त व उत्सव मंडळांचे समन्वयक रमाकांत बिरादर यांनी नवरात्रौत्सव मंडळांना केले आहे.

नवरात्रौत्सवामध्ये दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या विसर्जन सोहळ्याकरता महत्वाच्या विसर्जनास्थळांवरही महापालिकेच्यावतीने सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here