BMC : बोरिवलीतील अतिधोकादायक विष्णू निवासचे पाणी कापायला कामगार गेले होते की नव्हते?

58
BMC : बोरिवलीतील अतिधोकादायक विष्णू निवासचे पाणी कापायला कामगार गेले होते की नव्हते?
BMC : बोरिवलीतील अतिधोकादायक विष्णू निवासचे पाणी कापायला कामगार गेले होते की नव्हते?

विशेष प्रतिनिधी, मुंबई

बोरिवलीतील गितेश दावणकर चाळ अर्थात विष्णू निवास (Vishnu Niwas) ही सी वन प्रवर्गात मोडल्याने अतिधोकादायक बनलेली ही चाळ रिकामी न केल्याने या चाळीचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही महापालिकेकडून सुरू असून मागील २३ नोव्हेंबर रोजी पोलीस संरक्षण न मिळाल्याने ही कारवाई लांबणीवर पडली होती. दरम्यान या चाळीची पाहणी करण्यास केलेल्या जल अभियंता विभागाच्या कामगारांना बेकायदेशीर ठरवून भाजपाचे (BJP) माजी खासदार यांनी त्यांना पकडून पोलीस ठाणे दाखवले. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (BMC)

( हेही वाचा : IPL Mega Auction : आयपीएलने ‘या’ अननुभवी खेळाडूंनाही केलं कोट्याधीश

मुंबईतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्वे करून महापालिकेने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसारित करून त्या इमारतींना नोटीस जारी केली होती. त्यात बोरिवली (Borivali) येथील गितेश दावणकर चाळ अर्थात विष्णू निवासचा समावेश होता. त्यात रहिवाशांच्या तक्रारी आणि त्यांचे समाधान करण्यासाठी या तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशी नुसार या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आला. त्यानुसार याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी व्हिजेटीआय यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांचा अहवाल ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्राप्त झाला. त्या अहवालात चाळ सी वन प्रवर्गात अर्थात अतिधोकादायक जाहीर करून त्यांचे बांधकाम त्वरित तोडले जावे असे नमूद करण्यात आले.(BMC)

त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी पोलीस संरक्षण यासाठी अर्ज करून इमारतीचे वीज व पाणी तोडण्याची कार्यवाही करण्यासाठी तयारी केली असली तरी पोलीस संरक्षण न मिळाल्याने ही कारवाई लांबणीवर पडली होती. त्यामुळे या इमारतीच्या जल जोडणीची पाहणी करण्यास गेलेल्या आर मध्य विभागातील जल अभियंता विभागाच्या चार कामगारांना माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी विचारपूस करत त्यांना पाहणी करण्या पूर्वीच थांबवले आणि या सर्व कामगारांना पोलीस ठाण्यात ते घेवून गेले.(BMC)

महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आले. याचा अहवाल पाणी खात्याचे चार कामगार हे हरिदास नगर सिग्नल जवळ थांबले असता, गोपाल शेट्टी हे कामगारांना तेथून विष्णू निवासला जबरदस्ती घेऊन गेले. व तुम्ही पाणी कापण्यासाठी आला आहात तर परवानानगी दाखवा…अशी मागणी केली. पण आम्ही आम्ही त्यासाठी आलो नाही असे त्यांनी सागूंनही , शेट्टी यांनी त्यांना बसवून व्हीडीओ काढला .. तसेच पोलिसांना बोलवले. पोलिस मग त्या कामगारांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले आणि त्या कामगारांविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे.(BMC)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.