BMC : तरंगता कचरा नाल्यात येण्यापासून कसा रोखयचा? मागील १७ वर्षांपूर्वीची समस्या कायमच; पर्जन्य जलवाहिन्या विभाग आता करणार प्रयत्न

आगामी वर्षभरात नाल्यातून नियमित गाळ आणि कचरा बाहेर काढले जाईल, याची कंत्राटदार नेमून जबाबदारी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

232
Floting waste
Floting waste

मुंबईतील नाल्यांमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचर्‍यामध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॕपर्स असा विविध प्रकारचा तरंगता कचरा (फ्लोटिंग मटेरिअल) नागरिकांकडून टाकण्यात येतो. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत समन्वयाने हा तरंगता कचरा नाल्यात येण्यापासून कसा रोखता येईल, यादृष्टीने पर्जन्य जलवाहिन्या विभागाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत महानगरपालिकचे अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी व्यक्त केले. त्यादृष्टीने समन्वयासाठी बैठक लवकर आयोजित करावी, अशी सूचनाही त्यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला केली. विशेष म्हणजे वेलरासु हे मागील तीन वर्षांपासून अतिरिक्त आयुक्त असून त्यांना या तरंगत्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तीन- सव्वा तीन वर्षांनंतर प्रयत्न करावा लागत आहे. त्यामुळे मागील १५ ते १७ वर्षांपासून असलेली ही समस्या या काळात दूर होईल की कागदावरच राहिल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पूर्व उपनगरातील नाल्यातून गाळ काढून वाहून नेण्याच्या कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त वेलरासू यांनी शनिवार ६ मे २०२३ रोजी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ठिकठिकाणी कामांची स्थिती पाहून संबंधितांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले. यावेळी त्यांनी

मुंबईतील शहर भागात दादर-धारावी नाल्यातून गाळ काढण्याच्या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी केली. त्यानंतर पूर्व उपनगरात ए. टी. आय. नाला, व्ही. एन. पुरव मार्ग (चेंबूर), माहूल नाला, वसंतदादा पाटील महाविद्यालय (प्रियदर्शनी), रफी नगर नाला (गोवंडी), पीएमजीपी नाला, घाटकोपर मानखुर्द जोड रस्ता, मानखुर्द नाला, लक्ष्मीबाग नाला, पूर्व द्रुतगती महामार्ग (घाटकोपर), जॉली बोर्ड नाला, ९० फीट रोड (कांजूरमार्ग), बाऊंड्री नाला (मुलुंड) या भागातील कामांची पाहणी केली. ३१ मे २०२३ पर्यंत नाल्यातून गाळ काढण्याची कामे वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी यंत्रणेला दिले.

BMC3

मुंबईतील अनेक मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेला तरंगणारा कचरा हा नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक भागात नाल्यातून गाळ काढल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. हा तरंगणारा कचरा नियमितपणे काढावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले.

(हेही वाचा BMC : आता टाटा पॉवर कंपनीच्या विद्युत देणीसाठी बेस्टला ४४४ कोटींची आर्थिक मदत)

मुंबईतील नाल्यांमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचर्‍यामध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॕपर्स असा विविध प्रकारचा तरंगता कचरा (फ्लोटिंग मटेरिअल) नागरिकांकडून टाकण्यात येतो. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत समन्वयाने हा तरंगता कचरा नाल्यात येण्यापासून कसा रोखता येईल, यादृष्टीने पर्जन्य जलवाहिन्या विभागाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत महानगरपालिकचे अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी व्यक्त केले. त्यादृष्टीने समन्वयासाठी बैठक लवकर आयोजित करावी, अशी सूचनाही त्यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला केली.

छोट्या नाल्यांच्या ठिकाणी जाळ्या लावता येतील का अथवा ते नाले बंदिस्त करता येतील का? तसेच मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रिनिंग किंवा नेटचा पर्याय वापरता येईल का? याबाबतची चाचपणी करावी. नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार निविदा प्रक्रिया सुरू करावी. नाल्यातून गाळ काढण्याच्या व्यतिरिक्त ही प्रक्रिया पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून राबवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. आगामी वर्षभरात नाल्यातून नियमित गाळ आणि कचरा बाहेर काढले जाईल, याची कंत्राटदार नेमून जबाबदारी सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

BMC2

मुंबईतील नागरिकांची पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेचा पर्जन्य जलवाहिन्या विभाग अव्याहतपणे काम करत असतो. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून महानगरपालिका क्षेत्रात नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम वेगाने केले जात आहे. पूर्व उपनगरात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या नियोजित कामांचे उदिष्ट वेळेत पूर्ण करावे, अशी सूचनाही या पाहणी दौऱ्यात निर्देश वेलरासू यांनी केली. या दौऱ्यात उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (प्रभारी) (पर्जन्य जलवाहिन्या) प्रकाश सावर्डेकर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नाल्याच्या नजीकच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी नाल्यात थेट कोणताही कचरा न टाकता मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाला सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत उपआयुक्त उल्हास महाले यांनी व्यक्त केले. भरतीच्या काळात नाल्यातून तरंगणारा कचरा आणि गाळ काढण्याच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी तुंबण्याची गैरसोय टाळण्यासाठी कचरा नाल्यात न टाकता सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.