BMC : महापालिकेच्या कामकाजात आता AI चा वापर

64
BMC : महापालिकेच्या कामकाजात आता AI चा वापर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

आजच्या आधुनिक काळात महापालिकेच्या कामकाजातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेच्या कारभारात सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईतील पायाभूत सुविधांबाबतचे निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय चा वापर केला जाणार आहे. महापालिकेच्या विकास नियोजन खात्यामार्फत या एआयचा वापर केला कामकाजात केला जाणार आहे. (BMC)

(हेही वाचा – BMC : जळजोडणी आणि दुरुस्तीची कामे पूर्ण; ‘या’ भागांतील पाणीपुरवठा होणार सुरळीत)

मुंबई महापालिकेने भविष्यातील विकासाचा कल ओळखून संभाव्य शहरी मागणीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांबाबतची निर्णय प्रक्रिया सुधारण्याकरता विकास नियोजन खात्यामार्फत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआय चा वापर करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी आपल्या सन २०२५-२६ आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले. (BMC)

(हेही वाचा – मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य आणि मजबूत असावा; Nitesh Rane यांच्या सूचना)

महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या माध्यमातून मुंबईतील विकास नियोजनाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये एकूण किती इमारतींना बांधकामाच्या परवानगी दिल्या आहेत, त्यातील ७० मीटर पेक्षा अधिक बांधकामाच्या इमारती किती आहे, उद्यान, मैदान, मनोरंजन मैदान आरक्षित किती भूखंड आहेत, त्यांचे क्षेत्रफळ किती आहे अशाप्रकारच्या विकास नियोजन विभागाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांची माहितीकरता ए आय वापर कामकाज पध्दतीत केला जाणार आहे. या एआयच्या वापर केल्यास एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.