रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष: अधिकाऱ्यांनी घेतली कॅच दि रेनची शपथ

130

पावसाळ्याच्या ४ ते ५ महिन्यांत कोसळणारा पाऊस हा देशाच्या बहुतांश भागांसाठी पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. त्यामुळे भूगर्भातील जलपातळी वाढवणे, जमिनीतील ओलावा सुधारणे या बाबी आवश्यक आहेत. पावसाळा संपल्यानंतर ८ महिन्यांसाठीच्या कालावधीसाठी, म्हणजे पुढील पावसाळा सुरू होईपर्यंतच्या कालावधीत प्रत्येक वापरासाठी पाण्याची मागणी पूर्ण होणे आवश्यक असते.

ही मागणी पूर्ण करण्यासाठी आणि विशेषतः शहरी भागांमध्ये वाढणारे पूर कमी करण्यासाठी पाण्याचे संवर्धन, संरक्षण आणि नियोजन करण्याची नितांत आवश्यकता असतानाही मुंबईतील रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र २००३ पासून रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी न करणारे कर्मचारी आता जलशक्ती अभियानांत कॅच दि रेनसाठी शपथ घेताना दिसत आहेत.

(हेही वाचाः बापरे! मुख्यमंत्र्यांनी सांगितला साथीचा नवा रोग… म्हणाले, याचं निदान होत नाही)

घेतली जल शपथ

पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, त्याद्वारे भूजल पातळी वाढवणे या मुख्य हेतूने केंद्र सरकारद्वारे ‘जलशक्ती अभियानः कॅच दि रेन २०२२’ आखण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मुख्य उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या समारंभात मुंबई महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे सहभाग नोंदवून ‘जल शपथ’ घेतली.

काय आहे अभियान?

पाऊस जेव्हा आणि ज्याठिकाणी होईल, त्यानुसार जलसंचयन या संकल्पनेसह राष्ट्रीय जल मिशनने ‘कॅच दि रेन’ हे अभियान सुरू केले आहे. लोकसहभागातून लोकचळवळ उभी करुन, हवामान आणि मातीच्या स्थितीनुसार, पावसाच्या पाण्याची योग्य साठवण करण्यासाठी अनुकूल असे वर्षासंचयन संरचना तयार करणे, त्यासाठी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.

(हेही वाचाः यंदा एप्रिल तापदायक ठरणार!)

राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या जलशक्ती अभियान: ‘कॅच द रेन २०२२’ अभियानाचे उद्घाटन केले. या उद्घाटन प्रसंगी मुंबई महापालिकेतील जल अभियंता खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांना फेसबूक लाईव्हच्या माध्य‍मातून सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्या जल अभियंता खात्यातील विविध अधिकारी, कर्मचा-यांनी या समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदवून जल शपथ घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.