BMC : पुन्हा एकदा महापालिकेत महिला अधिकाऱ्यावर अन्याय

ज्येष्ठ आणि अनुभवी तरीही डॉ. जोशी यांच्याकडे शहर विभागाचाच भार

4029
BMC : पुन्हा एकदा महापालिकेत महिला अधिकाऱ्यावर अन्याय...
BMC : पुन्हा एकदा महापालिकेत महिला अधिकाऱ्यावर अन्याय...
विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा महिला अधिकाऱ्यावर अन्याय केला जात असून दुसऱ्यांदा अतिरिक्त आयुक्त म्हणून महापालिकेत आलेल्या डॉ. अश्विनी जोशी यांच्यावरील आयुक्तांचा अविश्वासच कायमच आहे. महापालिकेतील सर्वांत ज्येष्ठ अतिरिक्त आयुक्त असतानाही डॉ. जोशी यांच्याकडील पदभार कायमच ठेवत त्यांच्याकडे ज्येष्ठतेनुसार पदांचा भार सोपवण्यात आलेला नाही. त्यामुळे आयुक्त बदलले तरी जोशी यांच्याकडे त्यांच्या क्षमतेनुसार पदांचा भार न देता यापूर्वी अशाचप्रकारे आय ए कुंदन, जयश्री भोज, आश्विनी भिडे आदी अतिरिक्त आयुक्त व सहआयुक्त निधी चौधरी यांना डावलणाऱ्या आयुक्तांच्या रांगेत विद्यमान महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आपले स्थान मिळवले आहे. (BMC)

मुंबई महापालिकेतील भूषण गगराणी यांच्याकडे आयुक्त तथा प्रशासक म्हणून नियुक्ती झाली असून डॉ. अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी, अभिजित बांगर आणि डॉ. सुधाकर शिंदे यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे. त्यानुसार, आयुक्तांनी आपल्याकडे काही खाते व विभागांची जबाबदारी कायम राखून उर्वरीत अतिरिक्त आयुक्तांकडे खाते व विभागांचे वाटप केले आहे. (BMC)

(हेही वाचा – KEM Hospital : मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात सुरतमधील मुलाला मिळाले जीवनदान)

महापालिकेत डॉ. अश्विनी जोशी या सर्वांत ज्येष्ठ असून सन २०१८ आणि २०१९ या कालावधीत त्यांनी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केलेले आहे. या उर्वरीत तिन्ही अतिरिक्त आयुक्तांच्या तुलनेत जोशी या ज्येष्ठ आहे. त्यामुळे महापालिकेतील ज्येष्ठ अतिरिक्त आयुक्ताला प्रकल्प विभागाची जबाबदारी सोपवणे आवश्यक असते; परंतु जेव्हा या प्रकल्प विभागाची जबाबदारी सोपवली जात नाही, तेव्हा पूर्व उपनगरे किंवा पश्चिम उपनगरे यांचा भार सोपवणे आवश्यक असते. परंतु जोशी यांच्याकडे पूर्वीप्रमाणे शहर विभागाचाच भार कायम ठेवला आहे. सन २०१८ ते २०१९मध्ये महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून आरोग्य विभागाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे त्यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली होती आणि त्यांनी रुग्णालयातील औषध खरेदीला शिस्त लावली. त्यामुळे एकप्रकारे औषध खरेदी करण्याच्या प्रक्रिया योग्यप्रकारे राबवली जात होती. याशिवाय अत्यंत कडक आणि शिस्तीच्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. परंतु तत्कालिन ठाकरे सरकारने त्यांची बदली केल्यानंतर पुन्हा सप्टेंबर २०२३मध्ये त्यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. पण महापालिकेत त्यांच्याकडे शहर विभागाची जबाबदारी सोपवली होती.

जोशी यांच्याकडे शहर विभागाची जबाबदारी सोपवतानाच त्या खालोखाल ज्येष्ठ असलेल्या डॉ. अमित सैनी यांच्याकडे पूर्व उपनगरे तर त्यानंतर ज्येष्ठ असलेल्या अभिजित बांगर यांच्याकडे सर्वांत मोठ्या प्रकल्प विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे पश्चिम विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आधी अजोय मेहता, त्यानंतर इक्बाल सिंह चहल आणि आता भूषण गगराणी यांच्याकडूनही जोशी यांना ज्येष्ठता आणि अनुभवानुसार त्यांचा महापालिकेत सन्मान दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. (BMC)

(हेही वाचा – EVM-VVPAT: १००% मते व्हीव्हीपॅट संलग्न ईव्हीएमद्वारे मोजली जावीत, सर्वोच्च न्यायालयाकडून पडताळणीला सहमती)

१) भूषण गगराणी, महापालिका आयुक्त तथा प्रशासक
-धोरणात्मक बाबी व अंतर्खात्यांचे समन्वय व सर्व खात्यांचे पर्यवेक्षणासंबंधित बाबी.
– प्रमुख अभियंता (विकास नियोजन)
-निधीसंबंधीच्या विशेष तरतूदी, किरकोळ अग्रीम, अर्थसंकल्पामध्ये तरतूद न केलेल्या योजना/प्रकल्प ह्याकरिता विशेष मंजुरी संबंधीच्या सर्व बाबी.
-कोणत्याही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ह्यांना नेमून न दिलेले कोणतेही इतर विषय/खाती.
– दक्षता (अभियांत्रिकी शाखा), चाचणी लेखा परिक्षा व दक्षता अधिकारी, दक्षता अधिकारी (विशेष कार्य), प्रमुख अधिकारी (चौकशी).
२) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)
– परिमंडळ १ व २ चे प्रशासन
– सामान्य प्रशासन, कर्मचारी व कामगार विषयक प्रकरणे.
– विधि खाते
– अनुज्ञापन आणि दुकाने व आस्थापना खाते.
– नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र.
-मुद्रणालय
– जनसंपर्क, आंतरराष्ट्रीय संपर्क कक्ष आणि अशासकीय संस्थां संबंधींच्या धोरणांत्मक बाबी नागरीक गट, नागरीकांची सनद, इत्यादी.
– देवनार पशुवधगृह
-शहरी द्रारिद्रय निर्मूलन
– जिल्हा शहरी विकास संस्था.
– मध्यवर्ती पुराभिलेख कक्षाचे कामकाज.
-अतिक्रमण निर्मूलन / अनधिकृत बांधकाम हटविणे/फोटोपास देणे
– झोपडप‌ट्टी वसाहतींबाबतचे प्रशासन व झोपडप‌ट्टी वासीयांकरीता प्रधान मंत्री निधी कार्यक्रम, जुन्या इमारतींची दुरुस्ती व गृहनिर्माण प्राधिकरणांशी समन्वय व गृहनिर्माण संबंधी प्रकरणे.
– मोडकळीस आलेल्या इमारती संबंधीबाबी तसेच, शासनाकडील बैठकांना उपस्थित राहणे व
विधानसभा/परिषद प्रश्नांची उत्तरे देणे.
– शासनाशी समन्वय
– महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ बाबतचे कामकाज
-डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे परिरक्षण व प्रचालन
– संचालक (एमसीएमसीआर)
– प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
-राष्ट्रीय शहरी नुतनीकरण मिशन,
– बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमासंबंधीचे कामकाज
-प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प) प्रकल्प नियोजन व नियंत्रण कक्ष
– करनिर्धारण व संकलन खाते.
– मालमत्ता कर सुधारणाबाबतची अंमलबजावणी
– प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रचालन)
– दहिसर व अन्य ठिकाणांचे परिवहन केंद्रांचे प्रकल्प (Transport Hub Projects at Dahisar & other locations)
-पर्यावरण अभियांत्रिकी संबंधीचे कामकाज
– उपरोक्त नमूद विषयांसंबंधीचे अनुत्तरीत ठराव, प्रश्नावली, अल्प मुदतीचे प्रश्न याबाबत पाठपुरावा करणे
– निवडणूक

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: ६५ गावांचा मतदानावर बहिष्कार; कारणे वाचा सविस्तर…)

३) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)
– परिमंडळ ५ व ६ चे प्रशासन
– नगर अभियंता
-प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण)
– माहिती तंत्रज्ञान उपयोग व सुधारणा तसेच, महानगरपालिका संगणकीकरणाबाबतच्या बाबी
– उद्यान खाते
– प्राणीसंग्रहालय
– व्यवसाय विकास खाते. स्मार्ट शहर संबंधीत कामकाज
-एमयुटीपी, एमयुआरपी, सिडको, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा, इत्यादी संबंधीत कामकाज
-राजीव आवास योजना संबंधी बाबी, मेगा शहर प्रकल्प.
-गणेशोत्सव संबंधी बाबी
-नाट्‌यगृहे, तरण तलाव, वाचनालय, क्रिडा संकुल आणि सदर संकुलांच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्त मंडळे.
– किनारी रस्ता
-सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन (गेटवे ऑफ इंडिया बाबतचा विशेष प्रकल्प आणि टेक्सटाईल म्युझियम संबंधी बाबी, इत्यादी)
-शिक्षण खाते
– अग्निशमन खाते
४) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)
– प्रमुख अभियंता (मुंबई मलनिःसारण विल्हेवाट प्रकल्प) (गलिच्छ वस्ती स्वच्छता कार्यक्रम कक्ष वगळून)
– प्रमुख लेखापाल (वित्त) व प्रमुख लेखापाल (कोषागार) ह्यांची खाती, वित्तीय सुधारणा.
– प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा व मलनिःसारण) ह्यांच्याशी संबंधीत कामकाज.
– जल अभियंता, प्रमुख अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) दिर्घकालीन (लॉगरेंज) नियोजन कक्षासह.
-आर्ट अॅन्ड क्राफ्ट सेंटर, लव्हग्रोव्ह उदंचन केंद्र, वरळी, ह्यांचे संबंधीचे कामकाज.
– गोरेगांव मुलुंड लिंक रोड प्रकल्प
– प्रमुख अभियंता (पूल)
– प्रमुख अभियंता (रस्ते), सिमेंट काँक्रीट रस्ते व वाहतूक
-पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्प (WESTERN EXPRESS HIGHWAY ACCESS CONTROL
– प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या)
५)डॉ. सुधाकर शिंदे, अतिरीक्त आयुक्त ( पश्चिम उपनगरे)
-परिमंडळ ३, ४ व ७ चे प्रशासन
– आरोग्य खाते, सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय शिक्षण
-आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा, ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली
– सुरक्षा खाते
-मध्यवर्ती खरेदी खात्याशी संबंधीत कामकाज
-शिल्पग्राम, अंधेरी, संबंधीत कामकाज
– कोविड जम्बो सेंटर्स (सध्या सुरु असलेली व प्रस्तावित) संबंधीचे संपूर्ण कामकाज
-घनकचरा व्यवस्थापन आणि गलिच्छ वस्ती स्वच्छता कार्यक्रम कक्ष..
-क्षेपणभूमी संबंधित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प.
– संचालक (नियोजन)
-मालमत्ता खाते महानगरपालिकेच्या जमिनी व त्यावरील इमारती, माजी विश्वस्तांच्या चाळी, संपादित केलेल्या मालमत्तांचे व्यवस्थापन व पुनर्विकास
-१०% निवास स्थान आरक्षणासहित कर्मचा-यांना निवास स्थानाचे वाटप.
– बाजार
-उप प्रमुख अभियंता (सुधार) ह्यांच्याशी संबंधीत कामकाज

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.