BMC Planning Department : महापालिकेच्या नियोजन विभागासाठी अर्नस्ट यंग यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महापालिकेच्या विविध कंत्राट कामांमध्ये सल्लागारांची मदत घेतली जात असून आता प्रत्येक विकासकामांमध्ये सल्लागारांची मदत घेतली जात असतानाच महापालिकेच्या नियोजन विभागातही तांत्रिक सल्लागाराची सेवा घेण्यात येत आहे.

166
BMC Planning Department : महापालिकेच्या नियोजन विभागासाठी अर्नस्ट यंग यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती
BMC Planning Department : महापालिकेच्या नियोजन विभागासाठी अर्नस्ट यंग यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महापालिकेच्या विविध कंत्राट कामांमध्ये सल्लागारांची मदत घेतली जात असून आता प्रत्येक विकासकामांमध्ये सल्लागारांची मदत घेतली जात असतानाच महापालिकेच्या नियोजन विभागातही तांत्रिक सल्लागाराची सेवा घेण्यात येत आहे. तांत्रिक सल्लागारासोबत आरक्षित भूखंडांचा शोध घेण्यासाठी दोन शहर नियोजकाची नियुक्ती करण्यात येत आहे. यांच्या माध्यमातून सद्यस्थितीतील योजनांचा आढावा घेऊन अंमलबजावणीतील त्रुटीची पूर्तता करणे तसेच सामाजिक राखिव असलेल्या महिला वस्तीगृह, पाळणाघर, आधार केंद्र, रात्र निवारे आदी संदर्भातील धोरण निश्चिती व अंमलबजावणीकरिता सहाय्य करण्याच्या कामांसाठी सल्ला सेवा घेतली जाणार आहे. (BMC Planning Department)

मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने जेंडर बजेट अंतर्गत महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या योजना तथा उपक्रम राबवल्या जातात. महिलांना प्रशिक्षण तसेच आर्थिक मदत करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देतानाच स्वावलंबीही बनवले जातात. या नियोजन विभागाच्या विभागाने सर्व प्रकारच्या योजना ऑनलाईन करणे, बचत गटांकरिता ऍप विकसित करणे, जीपीएस बेस नाईट शेल्टर करणे, जीपीएस बेस बेघर फ्री मुंबई करणे, दिव्यांग समानसंधी विभाग करिता संगणकप्रणाली विकसन करावयाची असल्याने याच्या कार्यवाहीकरता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली नाही. यासाठी नविन संगणक प्रणाली विकसित केली जात आहे. या कामातील तांत्रिक बाबीनुसार प्रणाली विकसनाचे काम योग्य पध्दतीने होत आहे की नाही हे नियमितपणे जाणून घेण्यासाठी खात्यामध्ये योग्य मनुष्यबळ उपलब्ध नाही. (BMC Planning Department)

(हेही वाचा – Flight Tickets Increase : दिवाळीत विमान प्रवास महागणार)

२६ २५ मार्च २०२३ पर्यंत अकरा महिन्यांकरता दोन शहर नियोजक यांची नेमणूक करण्यात आली होती. या शहर नियोजकांकडून नोकरदार महिलांकरता गृहनिर्माण, वृध्दाश्रम, विद्यार्थी वसतीगृह, केअर सेंटर, आधार सेंटर, बेघर निवारा, ऍमेनिटी प्लॉट आदी विकास आराखडा २०३४मधील या आरक्षित भूखंडांची प्रमुख समाजविकास अधिकारी तथा समाज विकास अधिकारी यांच्यासह नियुक्त भेटीनंतर भूखंड अंतिम करण्याची प्रक्रिया केली जाईल. (BMC Planning Department)

यासाठी अर्नस्ट यंग यांची वरिष्ठ सल्लागार नियुक्त करण्यात आले असून यासाठी कामांसाठी ६० लाख ९८ हजार ४०० रुपये खर्च केला जात आहे. या वरिष्ठ सल्लागारामार्फत सद्यस्थितीतील योजनांचा आढावा घेऊन अंमलबजावणीतील त्रुटीची पूर्तता करणे, परिस्थितीनुरूप दुर्लब घटकांच्या विकासाकरिता आवश्यक गरजांचा अभ्यास करुन कृती आराखडा बनवुन त्याची अंमलबजावणी करिता सहाय्य करणे. संचालक (नियोजन) विभागाच्या उद्दिष्ट पूर्ततेकरिता व लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहचविण्याकरिताच्या दृष्टीने कृती आराखडा करणे, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांकरिता समन्वय साधणे, संचालक (नियोजन) यांच्या योजनांची/कामाचे वरिष्ठ पातळीवर सादरीकरण (पीपीटी) व अहवाल तयार करणे, या विभागाच्या विविध स्तरावरील कार्यपूर्ततेकरिता सेवाभावी संस्था, खाजगी संस्थांचे सीएसआर यांच्या मदतीकरिता समन्वय साधणे, या विभागाच्या सामाजिक राखिव असलेल्या महिला वस्तीगृह, पाळणाघर, आधार केंद्र, रात्र निवारे, इत्यादी संदर्भातील धोरण निश्चिती व अंमलबजावणीकरिता सहाय्य करणे आदी कामांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (BMC Planning Department)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.