-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने पात्र महिलांसाठी स्वयंरोजगार योजनेंतर्गत गरीब व गरजू महिला तसेच पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक महिलांना शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तब्बल ६७,१०० महिला पात्र ठरल्या होत्या आणि त्यातील केवळ ४,८३२ महिलांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे उर्वरीत ६२,२६८ महिलांना आता याचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी ८७ कोटी ०४ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. (BMC)
मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने जेंडर बजेट अंतर्गत महिला व बाल कल्याण योजनेच्या पात्र महिलांना स्वयंरोजगार या घटकांतर्गत २१ डिसेंबर २०२३मध्ये ६४,०१४ महिलांसाठी शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्रांची खरेदीला मंजुरी मिळाली होती. परंतु शिवणयंत्राच्या अर्थसहाय्याच्या रकमेत बदल झाल्यामुळे यामध्ये बदल झाल्यामुळे ही संख्या ६९, ६८९वर पोहोचली. त्यानुसार फेब्रुवारी २०२४ मध्ये मंजुरी प्राप्त झाली होती. परंतु या सर्व अर्जांची पडताळणी लेखा विभागाकडून झाल्यानंतर त्या शिवणयंत्राकरता ३५,३५८, घरघंटीकरता ३१,३०३ आणि मसाला कांडप करता ४३९ अशाप्रकारे एकूण ६७,१०० लाभार्थी पात्र ठरले. (BMC)
(हेही वाचा – IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा संघ जामनगरमध्ये कशाप्रकारे सुट्टी घालवतोय?)
मात्र या पात्र लाभार्थ्यांपैंकी शिवणयंत्रांकरता १८०८१, घरघंटीकरता २१,७९९ आणि मसाला कांडप यंत्रांकरता ४३८ अशाप्रकारे एकूण ४०,३१८ एवढे इझीपे कार्ड्स एकूण ६०,४४,५२,८५४ एवढ्या रकमेचे कार्ड स्टेट बँक ऑफ इंडियाकडून महापालिकेला प्राप्त होते. परंतु त्यापैंकी देवनार, गोवंडी (एम पूर्व), भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग (एस) आणि माटुंगा, शीव, वडाळा (एफ उत्तर) तीन विभागांकरता एकूण ४,८३२ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यामध्ये एकण शिवणयंत्रांकरका ११०९, एकूण घरघंटीकरता ३७२३ लाभार्थ्यांचा समावेश होता. परंतु लोकसभा निवडणूक २०२४च्या आचारसंहितेमुळे मार्च २०२४ पासून लागू झाल्यामुळे तसेच सन २०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपल्याने या योजनेची अंमलबजावणी होवू शकली नाही. यामुळे या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत तयार करण्यात आलेल्या उर्वरीत एकूण ३५,४८६ स्वाईप न झालेल्या इझीपेमधील अर्थसहाय्याची उर्वरीत ५२ कोटी २८लाख १३ हजार रुपयांची रक्कम महापालिकेला वळती करण्यात आली. (BMC)
त्यामुळे आता नियोजन विभागामार्फत उर्वरीत ६२,२६८ एवढ्या लाभार्थ्यांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांतील तरतूदीमधून लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापूर्वीच्या लाभार्थ्यांना आता चालू आर्थिक वर्षांच्या निधीतून यंत्र सामुग्रीकरता अर्थसहाय्य केले जाणार आहे. यामध्ये शिवणयंत्राकरता ३४,२४९, घरघंटीकरता २७,५८० आणि मसाला कांडपकरता ४३९ लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार असून यासाठी ८७ कोटी ०४ लाख ५५ हजार ७४२ रुपये खर्च केले जाणार असून याला यापूर्वीच मान्यता मिळाल्याने याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community