BMC: मुंबईत मलनि:सारण सुधारणा कार्यक्रमाची प्रगती धिम्यागतीने 

37

विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महापालिकेने (Mumbai Municipality) तब्बल ९ वर्षांपूर्वी मुंबई मलनि:सारण (Sewage Project) सुधारणा कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्या कामांची प्रगती अत्यंत कासवगतीने सुरु आहे. गेल्या वर्षभरात टप्पा एकमधील ९३.६८ किमी लांबीच्या मलनि:सारण वाहिन्यांच्या कामांपैंकी केवळ ७७.५२ किमी लांबीच्या मलवाहिन्या टाकण्याचे काम होवू शकले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १४३.१९ किमी लांबी पैंकी केवळ २३.८० किमी लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजही संपूर्ण मुंबईत मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे विणण्यात महापालिका अपयश ठरत आहे. परिणामी २१ टक्के लोकांना मलवाहिन्यांची सेवा सुविधा पुरवली जात नसल्याची माहिती समोर येत आहे. (BMC)

मुंबईच्या नागरिकांना १०० टक्के मलनि:सारण वाहिन्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यास मुंबई महापालिकेला बंधनकारक आहे. सध्या २०७ किमी लांबीचे मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे कार्यान्वित असून त्या माध्यमातून मुंबईच्या एकूण ७९.४० टक्के लोकसंख्येला आणि ८५.४३ टक्के क्षेत्रफळाला मलनि:सारण सुविधा पुरवली जात आहे. त्यानुसार, मुंबई मलनि:सारण सुधारणा कार्यक्रम (MSIP) हा कार्यक्रम सन २०१६-१७ पासून हाती घेण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, टप्पा एकमध्ये ९३.६८ किमी पैंकी ७७.५२ किमी लांबीच्या मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच १२.५१ कि.मी लांबीची कामे प्रगतीपथावर असून ३. ६५ किमी लांबीच्या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, तर टप्पा दोनमध्ये अविकसित विकास रस्त्यांसह १४३.१९ किमी लांबीच्या मलनि:सारण वाहिन्यांपैंकी २३.२७ किमी लांबीच्या मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच ३४.२७ किमी लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत.  २.८५ किमी लांबीच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरु आहे. या व्यतिरिक्त ५.८७ किमी लांबीची मलनि:सारण वाहिनी बदलण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच आगामी वर्षांत सुमारे १६.१५ किमी लांबीची नवीन कामे हाती घेण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Bangladeshi infiltrators: इराकला पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना मुंबईत अटक)

मागील वर्षाचा विचार केल्यास वर्षभरात  मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ शुन्य ०.३० टक्केच क्षेत्रफळालाच मलनि:सारण वाहिन्यांची (Sewage channels) सेवा पुरवता आली आहे. मागील वर्षी मुंबईच्या एकूण ८५.१५ टक्के क्षेत्रफळावर मलनि:सारण सुविधा पुरवण्यात आली होती, तर आतापर्यंत ही टक्केवारी ८५ .४३ टक्केच झाली आहे. तर मागील वर्षी ७७.८० टक्के लोकसंख्येला मलनि:सारण सुविधा पुरवली गेली होती, ही टक्केवारी आता ७९.४० टक्के झाली आहे. त्यामुळे सुमारे दोन टक्केच लोकसंख्येला मलनि:सारण वाहिन्यांची सुविधा देता आली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.