BMC Property tax: थकीत मालमत्ता कर भरा, नाहीतर कारवाईला सामोरे जा महापालिकेचा कारवाईचा इशारा 

322
Mumbai Digital Board : मुंबईत झळकणार ४०० डिजिटल जाहिरात फलक, महापालिकेच्या तिजोरीत महिन्याला वाढणार अडीच कोटींचा महसूल
मुंबई महापालिकेने (Municipal Corporation) मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी आता शेवटच्या दिवसात कडक पावले उचलली असून या विभागाच्या वतीने आणखी मालमत्ता थकबाकीदारांची आणखी टॉप टेन यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ओमकार डेव्हलपर्स प्रा. लि.,रघूवंशी मिल्स,एचडीआयएल, एल अँड टी स्कॉमी इंजिनिअरिंग आदी नामांकित कंपन्यांच्या समावेश आहे. या सर्व थकबाकीदारांना महापालिकेने कराची रक्कम भरण्यासाठी नोटिस बजावली आहे. (BMC Property tax)
 नागरिकांची ऐनवेळची गैरसोय टाळण्यासाठी साप्ताहिक सुटी तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सर्व विभागांमध्ये कर भरणा करण्याची सोय करण्यात आली आहे. परंतु, काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अद्याप करभरणा करण्यात येत नसल्याने आणि त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे खात्याच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या मालमत्ताधारकांनी निश्चित कालावधीमध्ये करभरणा न केल्यास त्यांच्या मालमत्तेला अटकावणी किंवा जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशी सूचना नोटिसीत देण्यात आली आहे. त्यामुळे नोटीसप्राप्त मालमत्ता धारकांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी लागलीच करभरणा करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Property tax) प्रशासनाकडून करण्यात आला आहे. (BMC Property tax)
दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या  ‘टॉप टेन’  थकबाकीदारांची यादी-
-एल अँड टी स्कॉमी इंजिनिअरिंग (एफ उत्तर विभाग)- ८८ कोटी ६३ लाख ७८ हजार ६७९ रुपये
-रघूवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग)- ७१ कोटी २३ लाख ६५ हजार ८५२ रुपये
-एचडीआयएल (एच पूर्व)- ५३ कोटी १२ लाख ३९ हजार ९५३ रुपये
-पोपटलाल जमनालाल, सी ब्रिझ बिल्डिंग ६ ते १५ मजले (जी दक्षिण)- ४७ कोटी ९९ लाख ८४ हजार ७६६ रुपये
-एचडीआयएल (के पूर्व)- ४४ कोटी ०५ लाख ५४ हजार ३५ रुपये
-रघूवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग)- १७ कोटी ८७ लाख ६१ हजार ५६५ रुपये
-सुभदा गृहनिर्माण संस्था (जी दक्षिण)- १६ कोटी ८४ लाख ७५ हजार  ७०० रुपये
-नॉव्हेल्टी सिनेमा (डी विभाग)- १६ कोटी  ०१ लाख ८० हजार ६३ रुपये
-ओमकार डेव्हलपर्स प्रा. लि. (जी दक्षिण विभाग)- १२ कोटी २१ लाख ३२ हजार १७३ रुपये
– गोल्डन टोबॅको कंपनी प्रा. लि (के दक्षिण विभाग)- ०८ कोटी ६७ लाख ८१ हजार ४८८ रुपये
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.