BMC : पहिल्याच पावसात मुंबईतील पंप पडले होते बंद; पण ‘या’ कंपन्यांवर नाही कारवाई

730
BMC : समुद्रात आता सोडले जाते प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी, जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे आणखी एक पाऊल

मुंबईत जोरदार पावसाच्या काळात सखल भागांमध्ये पाणी साचल्यास त्यांचा जलदगतीने निचरा होण्यासाठी संपूर्ण मुंबईत ४८१ ठिकाणी पंप लावण्यात आले. परंतु या पंपासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा. तसेच एखादा पंप जर वेळेत व योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले होते. परंतु सोमवारी पहाटेपासून अनेक भागांमध्ये साचल्यानंतर त्यांचा निचरा होऊ शकला नाही आणि यासाठी लावलेले पंपही बंद होते, अशी बाब आता समोर आली असून यानंतरही महापालिकेच्यावतीने अद्यापही कोणत्याही कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली नाही की त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. (BMC)

मुंबईतील नालेसफाईचे काम चोख केले आणि आणि सर्व पंपिंग स्टेशन कार्यन्वित केल्यानंतरही मोठ्या पावसात काही सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता कायम आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या आणि छोट्या नाल्यांची सफाई, तसेच पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा तसेच नव्याने वाहिन्या टाकण्याची कामे तसेच सहा मोठ्या पंपिंग स्टेशनसह मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी केल्यानंतर तुंबणाऱ्या तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वापरात येणाऱ्या पंपांची संख्या कमी होण्या ऐवजी उलट ही संख्या वाढतच आहे. मागील वर्षी ३८० पंप लावण्यात आले होते, परंतु यावर्षी तब्बल ४८१ पंप लावण्यात येत आहेत. त्यामुळे सखल भागांमधील पाणी तुंबण्याची भीती महापालिकेला आजही कायम असल्याचे बोलले जात होते. परंतु सोमवारी पहाटेपासून अनेक भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे हा अंदाज खरा ठरला. सोमवारी अनेक भागांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा न होण्यामागे पंपच कार्यान्वित नसल्याची बाब समोर आली आहे. (BMC)

मालाड सब वेमध्ये आजवर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पाण्याचा निचरा व्हायचा, परंतु सोमवारी या पाण्याचा निचरा अनेक तास होऊ शकला नाही. याठिकाणी ४८० अश्वशक्तीचे तीन पंप आणि १२५ अश्वशक्तीचे १ अशाप्रकारे ४ पंप असून हे सर्व पंप सुरु नसल्याने याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास विलंब झाला असल्याचे दिसून आले. तसेच लोअर परेल येथील मॅरेथॉन जवळील पाण्याचा पंप होता. तसेच अनेक भागांमध्ये पंप बंद असल्याच्या तक्रारी जिल्हा आपत्कालिन प्राधिकरणांच्या बैठकीतून समोर आल्या आहेत. (BMC)

(हेही वाचा – जातीपातीच्या राजकारणावरून केंद्रीय मंत्री Nitin Gadkari संतप्त; म्हणाले…)

मुंबईमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत अधिक पंप लावूनही मुंबईल जलमय होण्यापासून महापालिका वाचवू शकली नाही. सन २०२४-२५ या वर्षांसाठी पाच गटांमध्ये विभागून पंप बसवण्यासाठी संस्थांची नेमणूक केली होती. यासाठी सुमारे पावणे चार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. मात्र, पहिल्याच मुसळधार पावसात अनेक ठिकाणी पंप बंद असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अधिक विलंब झाल्यानंतरही महापालिकेच्यावतीने संबंधित कंत्राट कंपन्यांना ना नोटीस बजावली ना त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली. (BMC)

आपत्कालिन प्राधिकरणाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत, ज्या भागात पाण्याचा निचरा संथ गतीने होत असल्याचे आढळून आले होते, त्या भागांमध्ये अधिक पंप बसविणे किंवा अधिक क्षमतेचे पंप बसविणे यासारख्या उपाययोजना राबवाव्यात,असे निर्देश दिले. तसेच मुसळधार पावसा दरम्यान, जनरेटर बंद पडू शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन या पंपांसाठी वीज वितरण कंपन्यांकडून थेट ग्रीड कनेक्शन घ्यावे व डिझेल जनरेटर हे पर्यायी स्वरूपात कार्यतत्पर ठेवावेत, असे आदेश अध्यक्षांनी या बैठकीदरम्यान दिले. त्यामुळे पहिल्याच मुसळधार पावसात अनेक भागांतील पंप बंद असल्याचे स्पष्ट होत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.