मुंबईतील कचरा बंदिस्तपणे वाहून नेणार…

मुंबईतील कचरा बंदिस्त वाहनांमध्ये संकलन करून वाहून नेण्यासाठी आता महापालिकेच्यावतीने शहर, उपनगरांमध्ये आता मोठ्या आकाराचे अर्थात लार्ज कॉम्पॅक्टरर्सची खरेदी केली जात आहे. वाहनांच्या सांगाड्यावर हे कॉम्पॅक्टर बसवले जाणार असून खरेदीनंतर एक वर्षाचा हमी कालावधी तसेच सात वर्षांची देखभाल यासह यांची खरेदी केली जात आहे. यामध्ये वाहनांचा सांगाडा सुमारे २२ लाख आणि त्यावर लार्ज कॉम्पॅक्टर बसवण्यासाठी सुमारे २६ लाख याप्रमाणे याप्रमाणे प्रत्येकी ४८ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे ३२ कॉम्पॅक्टरची खरेदी आणि सात वर्षांची देखभाल आदींवर सुमारे प्रत्येक कॉपॅक्टर सुमारे २२कोटी रुपये खर्च केला जात आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांना दिलासा! CNG अडीच रुपयांनी स्वस्त, ८७ रुपये प्रतिकिलो दराने मिळणार)

लार्ज कॉम्पॅक्टर वाहनांचा समावेश

मुंबई महापालिकेने नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०१६चे पालन करण्यासाठी बंदिस्त वाहने म्हणून कचरा वाहून नेणाऱ्या लार्ज कॉम्पॅक्टर वाहनांचा समावेश आपल्या ताफ्यामध्ये केला आहे. या लार्ज कॉम्पॅक्टर वाहनांच्या सेवा विविध विभागांत कचरा कंकलनासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. सध्या महापालिकेच्या परिवहन विभागातील शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरे यांच्या ताफ्यात असलेल्या कचरा संकलन व वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या लार्ज कॉम्पॅक्टरर्सचे आठ वर्षांचे आयुष्यमान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे वाहनांऐवजी नवीन लार्ज कॉम्पॅक्टर्सची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत स्टेज सहाच्या प्रदुषण प्रमाणकाचे पालन करणाऱ्या वाहन सांगाड्यावर लार्ज कॉम्पॅक्टर ही यंत्रे बसवून त्याच्या पुढील एक वर्षांचा हमी कालावधी व्यतिरिक्त ७ वर्षांच्या सर्वसामावेशक देखभालीसाठी मागवलेल्या निविदेमध्ये अशोक लेलंड ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला ३२ कॉपॅक्टरच्या खरेदीसाठी एकूण २१ कोटी ८३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here