BMC : ‘स.का.पाटील’ उद्यानासह ‘बाबुला टँक मैदान’ आणि ‘वाल्टर डिसुझा’ उद्यानाचेही नुतनीकरण

सका पाटील उद्यानातील अभ्यासिकेचीही दुरुस्ती

199
BMC : 'स.का.पाटील' उद्यानासह 'बाबुला टँक मैदान' आणि 'वाल्टर डिसुझा' उद्यानाचेही नुतनीकरण
BMC : 'स.का.पाटील' उद्यानासह 'बाबुला टँक मैदान' आणि 'वाल्टर डिसुझा' उद्यानाचेही नुतनीकरण

मुंबईतील चर्नीरोड येथील स.का.पाटील उद्यानाचे नुतनीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले असून याठिकाणी भुयारी पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आल्याने या उद्यानाचा विकास होऊ शकला नव्हता. परंतु आता या उद्यानाचे नुतनीकरण (BMC) हाती घेण्यात येत आहे. यासाठी या उद्यानातील कुटुंब सखी उपहारगृहाची जागेचे बांधकाम तोडले जाणार असून जुन्या अभ्यासिकेच्या जागेचे नवीन बांधकाम, अभ्यासिकेची दुरुस्ती आदींसह कामे केली जाणार आहे. या स.का. पाटील उद्यानासह बाबुला टँक मैदान आणि वाल्टर डिसुझा उद्यानाचेही नुतनीकरण केले जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) आता शहर भागातील तीन प्रमुख उद्यानांच्या नुतनीकरणासह सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येत आहे. यामध्ये वाल्टर डिसुझा उद्यान, मांडवी येथील बाबुला टँक मैदान आणि चर्नीरोड येथील एस.के.पाटील  उद्यान यांच्या नुतनीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. या तिन्ही उद्यान व मैदानांच्या विकासासाठी के.आर. इन्फ्रोटेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीने उणे २१ टक्के दराने हे काम मिळवले असून या कामासाठी विविध करांसह ४ कोटी ६० लाख २८ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.

(हेही वाचा-Lower Parel : लोअर परळ डिलाईल पुलाची दुसरी मार्गिका येत्या चार दिवसांमध्ये होणार सुरु)

कशाप्रकारे होणार उद्यानांची कामे

स.का. पाटील उद्यान :

पदपथाची दुरुस्ती करणे,  सुरक्षा खोली बांधणे, उद्यानाच्या संरक्षण भिंतीची आवश्यक ठिकाणी डागडुजी करणे, गजेबोची रंगरंगोटी करणे, माळी खोलीची डागडुजी करणे, कुटुंब सखी उपहारगृह तोडणे, जन्या इमारतीच्या ठिकाणी नवीन लोड बेअरींग बांधकाम करणे, ऍम्पी थिएटरचे रुफ बसवणे, मुलांच्या खेळाचे व खुल्या व्यायामाचे साहित्या बसवणे, अभ्यास खोलीचे छत बदलणे, अभ्यासिकेची दुरुस्ती करणे, स्टडी टेबल व खुर्च्या पुरवणे आणि विजेच्या कामांसह हिरवळीची कामे करण्यात येणार आहे.

वाल्टर डिसुझा उद्यान :

पदपथाची दुरुस्ती करणे, उद्यानाच्या संरक्षक भिंतीची आवश्यक ठिकाणी डागडुजी करणे, उद्यानाच्या संरक्षक भिंतीची व त्यावरील लोखंडी जाळीची संपूर्ण रंगरंगोटी करणे, जुना गजेबा  तोडून टाकत नवीन बांधकाम करणे, अभ्यासिकेचे छत व फरश्या बदलणे, मुलांच्या खेळाचे साहित्य बदलणे, खुली व्यायामशाळा बनवणे तसेच हिरवळीची कामे करणे.

बाबूला टँक मैदान :

मैदानाच्या संरक्षण भिंतीची कामे वत्यावरील लोखंडी जाळी बसवणे, व्हॉलीबॉल कोर्ट बनवणे, मैदानावर लाल माती पसरवणे, तसेच फ्लड लाईट बसवणे, पिण्याच्या पाण्याची सोय आदी कामे केली जाणार आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.