- सचिन धानजी,मुंबई
मुंबईतील पहिल्या टप्प्यातील रस्ते (BMC Roads) कामांसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमधील रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी निविदा मागवण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ४०० किमी लांबीच्या सुमारे साडे सहा हजार कोटी रुपयांच्या कामांसाठी मागवलेली निविदा प्रक्रिया पूर्ण करून पात्र कंत्राटदारांची निवडही करण्यात आली आहे. परंतु आचारसंहितेमुळे या रस्ते कामांचे प्रस्ताव मंजुरीविना पडून पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडल्यास या पात्र कंत्राटदारांवरील जबाबदारी महापालिकेच्या माथी पडली जाण्याची शक्यत वर्तवली जात आहे. (BMC Roads)
(हेही वाचा- IPL 2024, Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलच्या नावावर टी-२० तील ‘हा’ मोठा विक्रम)
मुंबईत दुसर्या टप्प्यात ४०० किमी अंतरातील २०० हून अधिक रस्ते कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. तब्बल ६ हजार ३०० कोटींच्या कामांसाठी शहर आणि पूर्व उपनगरांमसाठी प्रत्येक एक आणि पश्चिम उपनगरांसाठी तीन अशाप्रकारे पाच भागांमध्ये कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र कंपनीची निवडही करण्यात आली आहे. मात्र, आचारसंहिता असल्याने या रस्ते कामांसाठी पात्र ठरलेल्या कंपनीचे प्रस्ताव मंजूर करता येत नाही. त्यामुळे आचारसंहिता संपताच यासाठीच्या सर्व कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (BMC Roads)
मुंबईत (Mumbai) पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे ज्या भागातील रस्ते कामांसाठी कंत्राटदाराची निवड केली जाते, त्या भागातील रस्त्यांवर खड्डे पडल्यास संबंधित कंत्राटदारांवर खड्डे बुजवण्याची जबाबदारी सोपवली जाते. परंतु, सुमारे ४०० किलो मीटर लांबीच्या सुमारे २०० रस्त्यांच्या कामांसाठीच्या कंत्राट कामांना मंजुरी न मिळाल्याने या संबंधित रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याची डागडुजी आणि देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेची राहणार आहे. महापालिकेच्या नियमानुसार, कंत्राट कामांना मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना देण्यात येणाऱ्या कार्यादेशानंतर संबंधित प्रकल्प कामांची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर असते. परंतु रस्ते कामांना मंजुरी न मिळाल्याने तथा कार्यादेशच न दिल्याने कंत्राटदारांवर याची जबाबदारी महापालिकेला निश्चित करता येत नाही. त्यामुळे जुन महिन्यात या प्रस्तावांना मंजुरी दिल्यास आणि कंत्राटदारांनी कार्यादेश स्वीकारल्यास संबंधित रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी कंत्राटदारांवर राहणार आहे. मात्र, जून महिन्यात कार्यादेश स्वीकारला तरी कंत्राटदारांना या रस्त्यांची कामे ऑक्टोबर २०२४ पासूनच करता येणार आहे. त्यामुळे कंत्राटदार याचे कार्यादेश त्वरीत स्वीकारतील का याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. (BMC Roads)
दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट काँक्रीटच्या कामांचा अंदाजित खर्च
शहर विभाग
परिमंडळ १ व २ : कुलाबा ते माहिम धारावी,शीव
अंदाजित कंत्राट : ११४२ कोटी ४ लाख
……
(हेही वाचा- Bombay High Court: औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतर विरोधाच्या याचिकेबाबत काय म्हणाले मुंबई उच्च न्यायालय? जाणून घ्या)
पश्चिम उपनगर
परिमंडळ ३ : वांद्रे पूर्व आणि पश्चिम, अंधेरी पूर्व
अंदाजित कंत्राट : ८६४ कोटी २७ लाख
परिमंडळ ४ : अंधेरी पश्चिम, गोरेगाव, मालाड
अंदाजित कंत्राट : १५६६ कोटी ६५ लाख
परिमंडळ ७ : कांदिवली, बोरिवली, दहिसर
अंदाजित कंत्राट : १४०० कोटी ७३ हजार
पूर्व उपनगर
परिमंडळ ५ व ६ : कुर्ला ते मुलुंड, गोवंडी देवनार
अंदाजित कंत्राट : सुमारे १३०० कोटी रुपये
हेही पहा-
Join Our WhatsApp Community