मुंबईतील ‘या’ भागांत येत्या २ आणि ३ मार्चला पाणी नाही, जरा सांभाळून वापरा पाणी

BMC S and N division some areas water supply closed
मुंबईतील 'या' भागांत येत्या २ आणि ३ मार्चला पाणी नाही, जरा सांभाळून वापरा पाणी

पूर्व उपनगरामध्ये भांडुप (पश्चिम) एस विभागातील क्वारी रोड या ठिकाणी १२०० मिलीमीटर आणि ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विषयक दुरुस्तीच्या कामामुळे भांडुप, कांजूरमार्ग या ‘एस’ विभागात आणि घाटकोपर व विद्याविहार या ‘एन’ विभागातील काही परिसरांमध्ये २ मार्च २०२३ रोजी मध्यरात्री १२ ते ३ मार्च २०२३ रोजी मध्यरात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

या भागातील पाणी पुरवठाक होणार खंडित

भांडुप, कांजूरमार्ग एस विभाग:

  • प्रताप नगर रस्ता लगतचा परिसर, कांबळे कंपाऊंड, जमील नगर, कोकण नगर, समर्थ नगर, मुथू कंपाऊंड, संत रोहिदास नगर, राजा कॉलनी, शिंदे मैदान, सोनापूर, शास्त्रीनगर, लेक मार्ग,सीएट टायर मार्ग,सुभाष नगर, आंबेवाडी, गावदेवी मार्ग, सर्वोदय नगर, भट्टीपाडा, जंगल मंगल मार्ग, भांडूप (पश्चिम), जनता बाजार (मार्केट), ईश्वर नगर, टॅंक मार्ग, राजदीप नगर, उषा नगर, व्हिलेज मार्ग, नरदास नगर, शिवाजी नगर, टेंभीपाडा, कौरी मार्ग लगतचा परिसर, कोंबडी गल्ली, फरीद नगर, महाराष्ट्र नगर, अमर कौर विद्यालय परिसर, काजू टेकडी, जैन मंदीर गल्ली, बुद्ध नगर, एकता पोलिस चौकी लगतचा परिसर, उत्कर्ष नगर, फुगेवाला कंपाऊंड, कासार कंपाऊंड, लाल बहादूर शास्त्री रस्त्यालगतचा परिसर आदी भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
  • जुना हनुमान नगर, नवा हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी फुले नगरमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
  • रमाबाई आंबेडकर नगर – १ आणि २, साई विहार, साई हिल मधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
  • लाल बहादूर शास्त्री मार्गा लगतचा मंगतराम पेट्रोल पंप पासून ते गुलाटी पेट्रोल पंप विक्रोळी पर्यंतचा परिसर, कांजूरमार्ग (पश्चिम) रेल्वे स्थानक लगतचा परिसर, नेव्हल कॉलनी, डॉकयार्ड  कॉलनी, सूर्यानगर, चंदन नगर, सनसिटी, गांधी नगर आंबेवाडी, इस्लामपुरा मस्जिद, विक्रोळी स्थानक (पश्चिम) लगतचा परिसर, लाल बहादूर शास्त्री लगतच्या औद्योगिक वसाहती, DGQA वसाहत, गोदरेज निवासी वसाहत, संतोषी माता नगर (टागोर नगर क्रमांक ५ – विक्रोळी पूर्व) – आदी भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

विक्रोळी,घाटकोपर एन विभाग:

  • लाल बहादूर शास्त्री मार्ग विक्रोळी (पश्चिम), विक्रोळी स्थानक मार्ग, विक्रोळी पार्क साईट व लोअर डेपो, पाडा पंपिंग स्टेशन वरुन पाणी पुरवठा होणारे इतर विभाग – लोअर डेपो पाडा, अप्पर डेपो पाडा, सागर नगर, म्युनिसिपल बिल्डिंग झोनमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
  • वीर सावरकर मार्ग
  • लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम), वाधवा, कल्पतरू, दामोदर पार्क, साईनाथ नगर मार्ग, उद्यान गल्ली, संघानी इस्टेट मधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

(हेही वाचा – होळी, धुलिवंदनासाठी मुंबई पोलिसांची नियमावली! पालन न केल्यास होणार कारवाई)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here