- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांचा पगार मागील सात ते आठ महिन्यांपासून विलंबापासून होत असून एरव्ही महिन्याच्या १ तारखेला होणारा पगार आता दोन किंवा तीन तारखेला होत आहे. पगार प्रत्येक महिन्याला विलंबाने होत असल्याने आता कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे.
मुंबई महापालिकेत सध्या ९० हजारांच्या आसपास कामगार, कर्मचारी आणि अधिकारी वर्ग असून १ लाख १३ हजार कर्मचारी, अधिकारी हे निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन हे मागील अनेक वर्षांपासून महिन्याच्या पहिल्याच तारखेला होत आले आहे. परंतु मागील सात ते आठ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार आणि निवृत्ती वेतनाची तारीख चुकत गेली असून मागील या महिन्यात म्युनिसिपल बँकेत खाते असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार हा मंगळवारी दुपारनंतर जमा झाला, तर इतर बँकेत खाते असणाऱ्यांचा पगार सोमवारी २ तारखेलाच जमा झाला. (BMC)
(हेही वाचा – बलात्काराचा आरोप असणाऱ्याला ‘Matoshree’ वर पक्षप्रवेश; Shiv Sena UBT कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप)
विशेष म्हणजे नेहमी एक तारखेलाच मासिक पगार आणि निवृत्ती वेतन जमा होत असल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढलेल्या विविध कर्जाचे हप्ते हे एक तारखेलाच कापून घेतले जाते. त्यामुळे खात्यात पगारच जमा न झाल्याने अनेकांचे ईसीएस रद्द झाले. परिणामी कर्मचाऱ्यांना डबल फटका बसला गेला आहे. त्यामुळे सातत्याने पगाराची तारीख पुढे सरकली जात असल्याने एकप्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण होऊ लागल आहे. अनेक निवृत्त कर्मचारी हे महिन्याच्या एक किंवा दोन तारखेलाच बँकेत जाऊन आपली रक्कम खात्यातून काढतात, परंतु ही रक्कम वेळीच जमा न झाल्याने अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना निराश होत माघारी परतावे लागले आहे.
याबाबत दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना निवेदन देत महापालिका कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेतन, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन हे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला दिले जावे अशी मागणी केली आहे. विहित दिनांकाला वेतन तथा निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्तीवेतन देणे हे प्रशासनावर बंधनकारक असताना, त्यास बाधा निर्माण होत आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये चौकशी केली असता, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडे निर्माण झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे वेतन/निवृत्ती वेतन/कुटुंब निवृत्तीवेतन देण्यास विलंब झाला. पणयापुढे काही अडचण होणार नाही, असे भारतीय स्टेट बैंक ऑफ इंडिया यांच्याकडून सांगण्यात आले असल्याचे कळते, परंतु या महिन्यातही कर्मचाऱ्यांचे वेतन/निवृत्ती वेतन/कुटुंब निवृत्तीवेतनाचे अधिदान विहित वेळेत झालेले नाही, याबाबतही चिंता व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community