- सचिन धानजी, मुंबई
आता शाळकरी मुलांमध्ये मोबाईल फोनचा वापर होत असल्याने सोशल मिडियाच्या आहारी मोठ्याप्रमाणात जात आहेत. यासाठी इंटरनेटचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याने याच्या अतिवापराबाबत मुलांमध्ये जागृकता आणण्यासाठी महापालिका शाळांमधील मुलांमध्ये सायबर साक्षरतेचे धडे शिकवले जाणार आहे. महापालिकेच्या इयत्ता ८ व ९ वीच्या मुलांना या सायरब सारक्षतेबाबत नॅशनल फॉरेसिक सायन्सेस युनिवर्सिटी अँड इनोवेशन काऊंन्सिल यांच्याकडून ज्ञान दिले जाणार आहे. (BMC School)
(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर कलमांखाली तक्रार दाखल)
सद्याच्या युगात सर्वात जास्त माहिती ही इंटरनेट वर उपलब्ध आहे. शैक्षणिक विकासासाठी इंटरनेट (आंतरजाल) वरील माहिती अत्यंत उपयुक्त आहे. परंतु, या माहितीचा वापर करताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यावी हे विद्यार्थ्यांना समजणे आवश्यक आहे. त्यासाठी सायबर साक्षरता उपयुक्त मानले जात आहे. त्यामुळे सायबर साक्षरता प्रकल्प महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यासाठी गुजरातमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिवर्सिटी रिसर्च अँड इन्नोवेशन काऊंसिल यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यानुसार महापालिका शिक्षण विभागाने या संस्थेची नेमणूक केल्याची माहिती मिळत आहे. (BMC School)
(हेही वाचा – २०१७ ते २०२० पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षासाठी अभय योजना लागू; DCM Ajit Pawar यांची विधानसभेत माहिती)
महापालिकेच्या आठवी इयत्ता आणि नववी इयत्ता यामध्ये अनुक्रमे दहा हजार विद्यार्थी पटसंख्या असून प्रति विद्यार्थ्यांकता ११ हजार ८०० रुपये शुल्क संस्थेला दिले जाणार आहे. त्यामुळे सुमारे २० हजार विद्यार्थ्यांकरता २३ कोटी ६० लाख रुपये खर्च केला जाणार आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांचा शारिरिक, मानसिक व बौद्धिक विकास करणे हा शिक्षणाचा मुळ उद्देश आहे. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन करण्यासाठी विविध प्रकारच्या साहित्यांची आवश्यकता असते. आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये होत असलेला अमुलाग्र बदलांचा प्रभाव शिक्षण क्षेत्रावरही होत असल्याने महापालिका शाळांमधील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांकरता सायबर साक्षरता उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC School)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community