-
सचिन धानजी,मुंबई
आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून नाव लौकीक असलेल्या मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाला आपल्या शिक्षकांची भरती प्रक्रियाच नियोजित वेळेत करता आलेली नाही. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून महापालिकेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया मागील मार्च महिन्यापासून राबवली जात आहे. सुमारे १३०० जागांसाठी हजारो हजारो अर्ज प्राप्त झाले आहेत. यातून उमेदवारांची निवड करून सप्टेंबर महिना उजाडत आला तरी शिक्षण विभागाला यातील २० टक्केही शिक्षकांची नियुक्ती करता आलेली नाही. त्यामुळे एका बाजूला सुमारे अडीच हजार शिक्षकांची रिक्त पदे आणि दुसरीकडे निवडणूक कामासाठी ८०० हून शिक्षकांच्या खांद्यावर जबाबदारी सोपविन जात आहे, अशा परिस्थितीत महापालिकेच्या शाळांमध्ये प्रत्यक्षात किती शिक्षक शिकवत असतील आणि भावी पिढीला काय शिक्षण देत असतील? त्यामुळे जर अशाप्रकारे शिक्षकच नसेल तर महापालिका शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा कसा राखला जाणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये (BMC School) विविध माध्यमांच्या विशेषता इंग्रजी माध्यमांतील शिक्षकांची अनेक पद रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी सुमारे १३०० शिक्षकांची भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यासाठी पवित्र पोर्टर वर मागवलेल्या जाहिरातीत हजारो उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यानुसार पात्र अर्जांची छाननी करून उमेदवारांची यादी तयार करून निवड प्रक्रियेला सुरुवात केली. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ६९५ पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित त्यांना पत्र पाठवून त्यांच्याकडून कागदपत्रे मागवून त्या कागदपत्रांची छाननी आणि पुढील प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर सुमारे ४०० पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्यांच्याही कागदपत्रांची तपासणी तथा छाननीची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे आतापर्यंत ४०० उमेदवारांची नियुक्ती केल्याचा दावा महापालिका शिक्षण (BMC School) विभागाकडून केला जात आहे. मात्र, मार्च महिन्यांत भरती प्रक्रिया राबवण्यात आल्यानंतर आता पर्यंत ४०० शिक्षकांनी नियुक्ती करता आल्याने हे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे मोठे अपयश मानले जात आहे. या भरती प्रक्रियेत काही तांत्रिक चुका केल्याने याचा फटका उमेदवारांची निवड करताना झाली असून ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या उपशिक्षणाधिकारी यांनी कटाक्षाने या प्रक्रियेचे काम न केल्याने याच्या अतिरिक्त आयुक्त डॉ अमित सैनी यांच्याकडून वारंवार शिक्षणाधिकारी यांनी खडे बोल ऐकण्याची वेळ येत होती.
मुंबई महापालिकेच्या शिक्षक सेनेचे अध्यक्ष के पी नाईक यांनी शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला विलंब होत असल्याचे म्हटले आहे. आज शिक्षकांची नाही म्हटले तरी अडीच हजार पदे रिक्त आहेत. मार्च महिन्यात १३०० पदे भरण्याची प्रक्रिया राबवूननही यासर्व शिक्षकांची भरती झालेली नाही. प्रशासन म्हणते की ४०० शिक्षकांची नियुक्ती झाली म्हणून, पण प्रत्यक्षात दीडशे ते दोनशे शिक्षकांचीच नियक्ती झाल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी आदींची प्रक्रिया एवढ्या धिम्या गतीने सुरु आहे की या शिक्षकांची भरती पुढील शैक्षणिक वर्षांतच होईल असे वाटते. दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या शाळांनी आपल्या बरोबरच भरती प्रक्रिया सुरु केली होती, त्यांची भरतीही पूर्ण झाली आहे. उलट आपल्याकडील काही शिक्षण सेवक जे शिक्षक म्हणून परमंट झाले होते, त्यांनी या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांसाठी अर्ज करून घराजवळ नोकरी मिळत असल्याने निवड झाल्याने महापालिकेच्या नोकरीचा राजीनामा दिल्याची काही प्रकरणे ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे शिक्षकांची आधीच पदे रिकामी, त्यात असलेलेही सोडून जात आहेत, मग शिक्षण विभागातील अधिकारी करतात काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तर शिक्षण समितीचे माजी सदस्य शिवनाथ दराडे यांनी अनेक शाळांमधील वर्गखोल्या शिक्षकांमुळे रिकामे असून मुलांना शिकवण्यास वर्गावर शिक्षकच उपलब्ध नाही. मात्र, तिथे शिक्षण विभागाचे लक्ष नाही, आणि भरती प्रक्रिया जलदगतीने राबवून भरती करण्याची मानसिकता काही अधिकाऱ्यांची नाही याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community