BMC School : शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रशासकीय कामांत रमले महापालिका शिक्षक, ज्ञानार्जनाचे काम करणार कोण?

1264
BMC School : शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रशासकीय कामांत रमले महापालिका शिक्षक, ज्ञानार्जनाचे काम करणार कोण?
BMC School : शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रशासकीय कामांत रमले महापालिका शिक्षक, ज्ञानार्जनाचे काम करणार कोण?

सचिन धानजी, मुंबई

शिक्षणाचा खेळखंडोबा ४  

मुंबई महापालिकेच्या शिक्षकांची (BMC School) एका बाजुला अडीच हजारांहून अधिक पदे रिक्त असतानाच त्यातील अनेक शिक्षकांची निवडणूक कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांचे वर्ग शिक्षकां विना रिकाम्या राहत असल्याने अनेक शिक्षकांना आपल्या वर्गा व्यतिरिक्त दुसऱ्या शिक्षकांच्या वर्गाची जबाबदारी सांभाळावी लागते. याचा परिणाम महापालिका शाळांमधील शिक्षणावर होत असून अनेक चांगल्या शिक्षकांची वर्णी तर प्रशासकीय कामांसाठी लावण्यात आली असून त्यातील बहुतांशी शिक्षक हे शिक्षणाधिकारी (Education Officer) यांच्या कार्यालयातच कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. (BMC School)

शिक्षणाधिकाऱ्यांनाच, शिक्षकांवर शिक्षकवण्याच्या जबाबदारी ऐवजी त्यांच्याकडून प्रशासकीय कामे करून  घेण्यातच अधिक स्वारस्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयातील शिक्षकांना पुन्हा शिकवण्यासाठी वर्गावर पिटाळण्याची गरज असतानाही ही मंडळी शिक्षणाधिकाऱ्यांच्या सेवेत का आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. (BMC School)

मुंबई महापालिकेच्या सुमारे ११२९ शाळा असून त्यामध्ये ३लाख ०६ हजार ३२ विविध माध्यमातील शाळांमध्ये  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ९ हजार ४८ शिक्षक कार्यरत आहेत. परंतु, यातील  ८०० हून अधिक शिक्षकांची निवड निवडणूक कामांसाठी केली असून  अनेक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने महापालिकेच्या वर्गांवर शिक्षकांची उणीव भरून काढण्यासाठी तासिका शिक्षकांची मदत घेतली जात आहे.

(हेही वाचा – Duleep Trophy 2024 : दुलिप करंडक गाजवणारा मुशीर खान कोण आहे?)

मात्र, महापालिकेच्या शाळांमधील सुमारे अनेक शिक्षक हे प्रशासकीय कामांमध्ये गुंतले गेले असून शिक्षकांना वर्गावरून जावून शिकवण्याच्या कामाऐवजी त्यांना प्रशासकीय कामे करून घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नियुक्ती केली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच अनेक शिक्षक हे प्रशासकीय कामे करत असल्याने एका बाजुला पदे रिक्त आणि दुसरीकडे निवडणूक कामांची जबाबदारी सोपवल्याने वर्गावर शिक्षक नसताना अनेक शिक्षक हे शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात  प्रशासकीय कामे करत असताना त्यांना पुन्हा वर्गावर पाठवण्याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयातील प्रशासकीयकमो करणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामांसाठी पाठवा नाहीतर शिकवण्यासाठी वर्गावर पाठवा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. काही ज्येष्ठ शिक्षकांच्या म्हणण्यानुसार,ज्ञानार्जनाचे काम हे शिक्षकांचे आहे, मुलांना शिकवणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु शिक्षकांचा पगार घेऊन काही शिक्षक हे प्रशासकीय कामे करत आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय कामे करणाऱ्या शिक्षकांना तिथून काढून त्यांच्या ऐवजी तासिक तत्वावर अथवा कंत्राटी तत्वावर प्रशासकीय कामे करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जावे अशी मागणी संघटनांकडून केली जात आहे. (BMC School)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.