BMC School मधील पटसंख्या वाढवण्यासाठी विविध कल्पना रुजवणाऱ्या शिक्षकांची गरज

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील (BMC School) पटसंख्या प्रत्येक वर्षी घटत असून शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंसह खिचडी आणि मोफत शिक्षण दिले जात आहे.  

33

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील (BMC School) विद्यार्थ्यांच्या संख्येत गळती लागल्याने, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारणे गरजेचे असल्याचा शेरा महापालिका लेखापरिक्षकांनी नोंदवला आहे. तसेच महापालिका शाळेत येण्याकरता प्रवृत्त करण्यासाठी शिक्षकांना विविध कल्पना रुजवणारे प्रशिक्षण देण्याचीही गरज असल्याचेही मत मुख्य लेखापरिक्षकांनी नोंदवले आहे

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील (BMC School) पटसंख्या प्रत्येक वर्षी घटत असून शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंसह खिचडी आणि मोफत शिक्षण दिले जात आहे.  मुंबई महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दु, गुजराथी, तमिळ, तेलगू, कन्नड, इंग्रजीसह माध्यमांच्या  भाषिक प्राथमिक व माध्यमिक आणि मुंबई पब्लिक स्कूल, सीबीएससी, आयसीएसई आणि आयबी अशाप्रकारे एकूण ११२९ शाळा असून यामध्ये सध्या ३ लाख २८ हजार ३४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तर या शिक्षकांना शिकवण्यासाठी ०९ हजार ४८ शिक्षक आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असतानाच आता मुख्य लेखापरिक्षकांनीच आता गुणवत्तेबाबत मत नोंदवले आहे. मुख्य लेखापरिक्षकांनी शिक्षण विभागाच्या सन २०२३-२४ या वर्षांच्या वार्षिक लेखा परिक्षा अहवालामध्ये हा निष्कर्ष नोंदवला आहे.

(हेही वाचा Shivaji University च्या नामविस्तारासाठी कोल्हापुरात १० हजार हिंदू उतरले रस्त्यावर)

मुख्य लेखापरिक्षकांनी आपल्या अहवाला असे नमुद केले आहे की, महानगरपालिकेच्या शाळांमधील (BMC School) विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये संथगतीने होणारी वाढ वाढविण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे.  तसेच महानगरपालिकेच्या शिक्षकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण जसे की, शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या विविध कल्पना शिक्षकांमध्ये रुजवणारे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षणावर होणाऱ्या खर्चाची उपयुक्तता वाढेल, असे म्हटले आहे.

तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालक असा संवाद साधणे गरजे असून या संवादामधून महापालका मुलांच्या शिक्षणासाठी करत असलेला खर्च व त्या खर्चाची फलश्रुती याचे चित्र प्रतिबिंबित होईल. याबरोबरच महानगर पालिकेच्या शाळेतील (BMC School) वातावरण स्वच्छ व प्रसन्नदायक ठेवण्याच्या दृष्टीने शाळा परिसराचे सुशोभीकरण करणेही गरजेचे असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही विविध स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगर पालिक शिक्षणासाठी करत असलेला खर्च  व त्या खर्चामधून प्राप्त होणारे विद्यार्थ्यांना फायदे यांच्याशी तुलना करणे शक्य होईल, असेही नमुद केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.