BMC School : खासगी संस्थांना दिलेल्या शाळा ताब्यात घ्याव्यात; मुख्य लेखापरिक्षकांनी नोंदवला निष्कर्ष

305
BMC School : खासगी संस्थांना दिलेल्या शाळा ताब्यात घ्याव्यात; मुख्य लेखापरिक्षकांनी नोंदवला निष्कर्ष
BMC School : खासगी संस्थांना दिलेल्या शाळा ताब्यात घ्याव्यात; मुख्य लेखापरिक्षकांनी नोंदवला निष्कर्ष

महानगरपालिकेला (Brihanmumbai Municipal Corporation) खाजगी संस्थेला ना नफा ना तोटा तत्वावर शाळा चालविण्यासाठी दिलेल्या जागेवर व्यापारीकरण झाल्याने अशा सर्व जागा पुन्हा ताब्यात घेणे आवश्यक आहे,असे शेराच महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षकांनी मारला आहे. खाजगी संस्थांना भाडे तत्वावर देण्यात आलेल्या शाळा या मुख्यत्वः मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी असल्याने अशा शाळा ताब्यात घेऊन मुंबई पब्लिक स्कूलच्या (Mumbai Public School) उपक्रमानुसार वापरात आणल्यास महानगरपालिकेच्या शिक्षणावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी मदत होईल,असेही मुख्य लेखापरिक्षकांनी आपल्या अहवालात नमुद केले आहे. (BMC School)

( हेही वाचा : गांधी, पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांनाही British द्यायचे निर्वाह भत्ता 

महापालिका शिक्षण विभागाच्या सन २०२३-२४ च्या लेखापरिक्षक अहवालामध्ये मुख्य लेखापरिक्षकांनी आपले निष्कर्ष नोंदवत शिक्षण विभागाच्यावतीने सुरु असलेल्या शिक्षण कार्यपध्दतीबाबत शेरा मारला आहे. या अहवालामध्ये मुख्य लेखापरिक्षकांनी जुन्या मोडकळीस आलेल्या आणि त्या जागेच्या पुनर्विकासात उभ्या असलेल्या इमारतीबाबतचही प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्य लेखापरिक्षकांनी यात असे म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या जुन्या जमीनदोस्त केलेल्या शाळा व त्या शाळांच्या जागांमध्ये सध्या अस्तित्वात तथा बांधण्यात आलेल्या इमारती तसेच या इमारतीचा वापर कोणत्या प्रयोजनासाठी करत आहेत याची खातरजमा उपलब्ध कागदपत्रांवरून करता येत नसल्याने ही कागदपत्रे अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे नमुद केले आहे. (BMC School)

याबरोबरच महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलप्रमाणे (Mumbai Public School) अनेक शाळा निर्माण करणे गरजेचे आहे. मुंबई पब्लिक स्कूल (CBSE Board) ला जनमानसात खूप मागणी असल्याचे निदर्शनास येत असल्याचाही निष्कर्ष या अहवालात नमुद केला आहे. विशेष म्हणजे सन २०१८मध्ये महापालिकेच्या शाळेंमधील मुलांची संख्या कमी झाल्यामुळे तब्बल ३५ शाळा बंद करण्यात आल्या आणि याच शाळा सार्वजनिक लोक सहभाग कार्यक्रम अंतर्गत खासगी संस्थांच्या शिक्षकांसह संपूर्ण शालेय व्यवस्थापन या धोरणानुसार चालवण्यास देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या दबावानुसार मंजूर करण्यात आला होता. या मंजुरीनुसार ३५ शाळा प्रथम खासगी संस्थांना चालवण्यास देण्यात आल्या होत्या. परंतु आता याच खासगी संस्थांना देण्यात आलेल्या शाळा महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) शिक्षण विभागाने परत घ्याव्यात अशाप्रकारचा शेराच मुख्य लेखापरिक्षकांनी मारला आहे. (BMC School)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.