BMC School : शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार? अनुभवी शिक्षक निवडणूक कामात, दीडशे रुपयांचे तासिका शिक्षक वर्ग खोल्यांवर!

1462
BMC School : शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार? अनुभवी शिक्षक निवडणूक कामात, दीडशे रुपयांचे तासिका शिक्षक वर्ग खोल्यांवर!
BMC School : शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार? अनुभवी शिक्षक निवडणूक कामात, दीडशे रुपयांचे तासिका शिक्षक वर्ग खोल्यांवर!
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील (BMC School) शिक्षणाच्या दर्जा बाबत कायमच चिंता व्यक्त केली जात असतानाच आता हा डाग पुसण्यासाठी मुंबई पब्लिक स्कूलचा आधार घेतला आहे. परंतु भावी पिढील घडवणाऱ्या महापालिकेच्या अनुभवी शिक्षकांना वर्गावरून थेट निवडणूक कामांसाठी जुंपवले जात असून त्यांच्या जागी वर्गावर तासिका शिक्षकांना पाठवले जात आहे. त्यामुळे शिक्षकांना निवडणूक ड्युटीवर पाठवून महापालिकेच्या शिक्षणाचा दर्जा अजून कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याने खरोखरच महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभागासह शिक्षणमंत्र्यांना महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न होतोय का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये (BMC School) सुमारे दहा हजारांहून अधिक शिक्षक असून त्यातील दोन हजारांहून अधिक शिक्षकांची निवडणूक कामांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या एकूण ८५०० कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मागणी केली आहे. त्यात शिक्षकांची संख्याच दोन हजार एवढीच आहे. या निवडणूक कामांसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना तीन दिवस निवडणूक काम आणि तीन दिवस मुलांना शिकवणे अशाप्रकारे तारेवरील कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शिक्षक निवडणूक कामांसाठी गेल्याने तासिका शिक्षकांची मदत घेतली जाते तर काही ठिकाणी दुसऱ्या वर्गावरील शिक्षकांना अतिरिक्त वर्ग सांभाळण्याची जबाबदरी सोपवली जाते. त्यामुळे बाईच वर्गावर नसल्याने मुलांची मजा झाली आहे, त्यामुळे मुलांना पुस्तक काढा आणि अमूक अमूत धडा वाचत बसा असे सांगून एकाच वेळेला शिक्षकांना दोन दोन वर्गांचा भार सांभाळावा लागत आहे.

(हेही वाचा – BMC : डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे), जोशींकडून काढला परवाना विभागाचा भार…)

follow first national duty

महापालिकेच्या (BMC School) एका शिक्षिकेने सोशल मिडियावरील फेसबूकवर आपला व्हिडीओ अपलोड केला आहे आणि वर्गात शिकवण्याऐवजी उन्हात फिरत या शिक्षिकांना निवडणुकीचे काम करावे लागत आहे, असे म्हटले आहे. त्यात त्या असे म्हणतात की, वर्ग रिकामी सोडून या कामासाठी आम्हाला नियुक्त केले आहे. शिक्षकांना त्यांचं मुख्य काम करून देत नाहीत. वय वर्ष ५५ वरिष्ठ शिक्षकांना आज शिक्षणाधिकाऱ्यांकडून ऑर्डर येते की वर्ग रिकामे ठेवा पण ‘follow first national duty’ असे अधिकारी बोलतात. कोणाला काहीच पडलेली नसते. वरून आलं की खाली पाठवले आणि ते त्यांनी फॉलो नाही केले तर मेमो द्यायचा. तोंड बंद करून बुक्क्यांचा मार येथे सहन करावा लागतो. आणि हसायला येते वॉर्ड मधील घनकचरा किंवा ऑफिसमध्ये वॉर्ड बॉय हे इलेक्शन ऑफिस मध्ये सुपरवायझर आहेत. त्यांच्या हाताखाली आम्ही काम करायचे? किती दुर्दशा आहे शिक्षकांची. हे ऑफिसमध्ये बसलेले असतात आणि शिक्षक सर्व शिक्षक बहुतांशी ५०च्या पुढेच आहेत. ते एरियात जातात आणि काम करतात.

२ 2

गोवंडी स्टेशन येथील आमची पॉप्युलर शाळा, जिथे अधिकारी सतत भेट देत असतात आणि अशा शाळेचीच अशी अवस्था आहे. दोन वर्ग रिकामी आहेत. पाचवीचा वर्ग आणि सहावीचा वर्ग आणि मी सातवीची शिक्षिका. पाचवी, सहावीच्या शिक्षकांना बाहेरून हायर घेतले आहे. आणि ३१ ऑगस्ट रोजी चौथीच्या वर्गाच्या बाई सेवा निवृत्त झाल्या आहेत. उद्यापासून चौथीचा वर्गाला शिक्षक नाहीत म्हणजे एकंदरीत चार वर्ग रिकामी आहेत. बघा हा आहे महापालिकेचा कारभार, अशा भावना त्यांनी सोशल मिडियावर व्यक्त केल्या आहे.

(हेही वाचा – Rabies Free Mumbai साठी आता शाळांमधून जनजागृती)

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास विलंब झाला म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केले जाते. परंतु याच महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना निवडणूक कामांसाठी पाठवले जात असताना त्यांना रोखण्याची हिंमत महापालिकेच्या आयुक्तांमध्ये नाही. महापालिका आयुक्त हे विधानसभा निवडणुकीकरता निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहे. परंतु आधीच महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असताना त्यातील काही शिक्षकांना निवडणूक ड्युटीवर पाठवून तासिका शिक्षकांची मदत घेऊन महापालिका शाळांचा (BMC School) कारभार चालवला जात असल्याने पुन्हा एकदा महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.