BMC School : मुंबई महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे; सोमवारपासून क्रीडांगणाची स्वच्छता राखली जाणार

450
BMC : नितीन शुक्ला यांची दीड महिन्यात बदली; बी विभागात आता कशी करणार कारवाई?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेला व्यापक व लोकसहभागातून क्रियाशील स्वरुप देण्यासाठी सातत्याने विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्याचाच पुढील टप्पा म्हणून मुंबईत सोमवारी १ एप्रिल २०२५ पासून क्रीडांगणे आणि शाळांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सोमवार, १ एप्रिल ते शुक्रवार, ४ एप्रिल २०२५ दरम्यान मुंबईतील क्रीडांगणांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. त्यानंतर शाळांमध्ये सोमवार, ७ एप्रिलपासून पुढील १५ दिवस (दर आठवड्याला सोमवार ते शुक्रवार) ही मोहीम राबविली जाणार आहे. (BMC School)

मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर रहावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. त्या अंतर्गतच महानगरपालिकेच्या संपूर्ण २४ प्रशासकीय विभागांमध्ये साततत्यान स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते. या मोहिमेत आता शैक्षणिक संस्था आणि क्रीडांगणांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, अशी माहिती उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिली. (BMC School)

(हेही वाचा – Tamil Nadu मधून ‘द्रमुक’चा सुपडासाफ करणार; Amit Shah यांचे स्टॅलिन यांना आव्हान)

विशेष स्वच्छता मोहिमेच्या या टप्प्यात सोमवार, १ एप्रिल ते शुक्रवार, दिनांक ४ एप्रिल २०२५ दरम्यान आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, सोमय्या मैदान, अंधेरी क्रीडा संकुल, कोरा केंद्र (बोरिवली), मुलुंड क्रीडा संकूल येथे स्वच्छता करण्यात येणार आहे. (BMC School)

तसेच सोमवार, ७ एप्रिल २०२५ पासून पुढील १५ दिवस महानगरपालिका शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासह सर्व शासकीय शाळा, शैक्षणिक संस्था, खासगी शाळांमध्येही स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे. क्रीडांगणांमधील स्वच्छता मोहीम संबंधित प्रशासकीय विभागांद्वारे (वॉर्ड) आयोजित केली जाईल. प्रत्येक वॉर्ड या मोहिमेदरम्यान स्वच्छता आवश्यक असलेल्या ठिकाणांना प्राधान्य देणार आहे. यात खेळाचे मैदान, शाळेचा परिसर, वाहनतळ, कचरा संकलनाचे ठिकाण आणि पदपथ यांचा समावेश असेल. (BMC School)

(हेही वाचा – Nashik News : हॉस्पिटलमध्ये मधमाशांचा हल्ला ; सहा जण जखमी)

शाळा आणि क्रीडांगणांवर दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही मोहीम पार पाडणार आहे. या मोहिमेत महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग, शाळा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, शालेय विद्यार्थी (इयत्ता ८ वी वर्गापुढील), महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसहायता गट (एसएचजी), गृहनिर्माण संस्था आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिक आदींना सहभागी करून घेतले जाणार आहे. या मोहिमेत मेकॅनिकल पॉवर स्वीपर, कचरा वेचक, मिस्टिंग मशीन, डंपर, जेसीबी, पाण्याचे टँकर आणि फायरएक्स उपकरणांचा वापर केला जाणार आहे. (BMC School)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.