BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी बनवल्या कागदी पिशव्या

542
BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी बनवल्या कागदी पिशव्या

जागतिक पिशवी दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याच्यादृष्टीकोनातून पर्यावरण पुरक असलेल्या कागदापासून पिशवी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील ५४ स्पर्धा केंद्रावर आयोजित या स्पर्धेत महापालिकेच्या इयत्ता ६ वी ते ८ वीच्या इयत्तेच्या २३४३ विद्यार्थ्यांनी भाग घेत आकर्षक पिशव्या बनवल्या. (BMC Schools)

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत कार्यानुभव विभागा मार्फत शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) सुजाता खरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव विभागाने जागतिक पिशवी दिनाचे औचित्य साधून प्लास्टिक पिशवीचा वापर टाळण्यासाठी पर्यावरणाला पूरक असलेल्या कागदा पासून कागदी पिशवी तयार करणे करण्यासाठी २६ जुलै २०२४ रोजी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. एकूण ५४ स्पर्धा केंद्रांवर घेण्यात आली होती. (BMC Schools)

(हेही वाचा – Student : मागील 5 वर्षांत मृत्यू परदेशात शिकण्यासाठी गेलेल्यांपैकी 633 भारतीय विद्यार्थ्यांचा मागील 5 वर्षांत मृत्यू; कॅनडात सर्वाधिक)

महानगरपालिकेच्या सर्व भाषिक मुंबई पब्लिक स्कूलसह सर्व शाळेतील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या २३४३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आकारामध्ये सुंदर आणि आकर्षक पिशव्या तयार केल्या होत्या. याला सर्व विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला असून या स्पर्धेमध्ये केंद्रप्रमुख यांच्या मदतीने कार्यानुभव निदेशक तृप्ती पेडणेकर यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. (BMC Schools)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.