मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदाची अनेक पदे रिक्त असून अनेक विभागीय सहायक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती दिल्यानंतरही त्यांच्याकडे सहायक आयुक्तपदाचा प्रभारी भार कायम ठेवला आहे. परंतु ही पदे भरण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांकडून अर्ज भरुन त्यांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कार्यकारी अभियंत्यांची या पदासाठी निवडही करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात या पदासाठी निवड होऊनही त्या सर्वांची सहायक आयुक्तपदी कुठेही नियुक्ती आदेश जारी करण्यात आलेले नसून नक्की या कार्यकारी अभियंत्यांच्या नियुक्तीचे घोडे अडले कुठे आणि कोणी अडवले असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)
मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्तपदाच्या अनेक जागा रिक्त असल्याने कार्यकारी अभियंत्यांची या पदी निवड करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार या पदासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकारी अभियंता यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यात सहा कार्यकारी अभियंत्यांनी अर्ज करून मुलाखती दिल्या तसेच यासाठीची परीक्षाही उत्तीर्ण केली. परंतु पात्र ठरलेल्या सहा पैंकी एका कार्यकारी अभियंत्याने माघार घेतल्याने आता पाच अधिकाऱ्यांची या पदासाठी निवड झाली. पण या अभियंत्यांची निवड झाल्यानंतरही अद्यापही यांची सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. (BMC)
(हेही वाचा – महाविकास आघाडीत ‘नेतृत्वावरून’ रस्सीखेच; Sanjay Nirupam यांचे टिकास्त्र)
मिळालेल्या माहितीनुसार, पाच कार्यकारी अभियंता यांची सहायक आयुक्तपदी अंतिम निवड करून त्यांचे प्रस्ताव सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यासाठी सर्व मंजुरीनुसार पाठवण्यात आले आहे. त्यानुसार या सर्वांचे प्रशासकीय विभागानुसार नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्याची प्रक्रिया शिल्लक असून या पाचही जणांच्या नियुक्तीचे आदेश आचारसंहिता संपून महिला उलटून गेला तरी काढण्यात आलेले नाही. त्यामुळे या कार्यकारी अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश न काढण्यामागे नक्की कुणाची आडकाठी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या पी उत्तर, एम पश्चिम आणि बी विभागाचे सहायक आयुक्त अनुक्रमे किरण दिघावकर, विश्वास मोटे आणि संतोष धोंडे आदींची उपायुक्त पदी बढती देण्यात आली. मात्र, उपायुक्त पदाचा भार सोपवतानाच त्यांच्याकडे विभागीय सहायक आयुक्त पदाचा भार कायम ठेवण्यात आला आहे. परिणामी विभागाचे सहायक आयुक्त तसेच उपायुक्त पदाचा भार सांभाळताना तिन्ही अधिकाऱ्यांना तारेवरील कसरत करावी लागते. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community